22 November 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Top MCap Companies Market Valuation Declined | 'या' टॉप 5 मिड कॅप कंपन्यांचे बाजारमूल्यांकन घसरले

Top MCap Companies Market Valuation Declined

मुंबई, 24 ऑक्टोबर | भारतातील टॉप 10 पैकी टॉप 5 कंपन्यांचे बाजारमूल्यांकन गेल्या आठवड्यात घसरले. टॉप -5 कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्यांकनात गेल्या आठवड्यात 1,42,880.11 कोटी रुपयांची घट (Top MCap Companies Market Valuation Declined) झाली. त्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सर्वात जास्त तोट्यात आहेत.

Top MCap Companies Market Valuation Declined. The market valuation of the top 5 companies out of India’s top 10 saw a decline last week. The combined market valuation of the top-5 companies declined by Rs 1,42,880.11 crore last week :

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) चे बाजारमूल्य 45,523.33 कोटी रुपयांनी घसरून 5,76,836.40 कोटी रुपयांवर आले. त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे बाजार मूल्यांकन 45,126.6 कोटी रुपयांनी घसरून 16,66,427.95 कोटी रुपये झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे बाजारमूल्य 41,151.94 कोटी रुपयांनी घसरून 12,94,686.48 कोटी रुपयांवर आले.

याशिवाय, बजाज फायनान्सचे बाजार मूल्यांकन (एम-कॅप) 8,890.95 कोटी रुपयांनी घसरून 4,65,576.46 कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँक लिमिटेडच्या बाजार मूल्यांकनात 2,187.29 कोटी रुपयांची घसरण झाली आणि त्याचे बाजार मूल्यांकन 9,31,371.72 कोटी रुपयांवर आले.

या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात वाढ झाली. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेने 30,747.78 कोटी रुपयांची भर घातली आणि तिचे मूल्यांकन 4,30,558.09 कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे बाजारमूल्य 22,248.14 कोटी रुपयांनी वाढून 5,26,497.27 कोटी रुपयांवर पोहोचले.

एचडीएफसीचे मूल्यांकन 17,015.22 कोटी रुपयांनी वाढून 5,24,877.06 कोटी रुपये झाले. भारतीय स्टेट बँकेचे बाजार मूल्यांकन 11,111.14 कोटी रुपयांनी वाढून 4,48,863.34 कोटी रुपये झाले. त्याच वेळी, इन्फोसिसने 1,717.96 कोटी रुपये जोडले आणि त्याचे मूल्यांकन 7,29,410.37 कोटी रुपये होते.

याशिवाय गेल्या आठवड्यात बीएसई ३० शेअर्सचा बेंचमार्क सेन्सेक्स ४८४.३३ अंकांनी किंवा ०.७९ टक्क्यांनी घसरला होता. शुक्रवारी सेन्सेक्ससोबतच निफ्टीमध्येही घसरण पाहायला मिळाली. टॉप -10 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्सने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यापाठोपाठ TCS, HDFC बँक, Infosys, HUL, ICICI बँक, HDFC, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँक यांचा क्रमांक लागतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Top MCap Companies Market Valuation Declined in last week.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x