25 November 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
x

ऑक्टोबर हिट’चा सप्टेंबर मध्येच तडाखा, मुंबईकर उष्णतेने हैराण

मुंबई : राज्यात सध्या पावसाने परतीचा रस्ता घेतल्यानंतर ऑक्टोबर हिट’चा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी तापमानचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. घराबाहेर पडताच मुंबईकर घामाघूम होतोय. सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे.

अंगाची लाहीलाही होत असल्याने चाकरमानी गारेगार सरबतचा आस्वाद घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर वातावरणातील वाढत्या उकाड्याने त्रस्त झाला आहे. गॉगल घालून, स्कार्फ बांधून मुंबईकर घराबाहेर पडतोय. मुंबईत येत्या २४ तासात हवामान किंचित ढगाळ राहील. तर राज्यातील काही भागात किरकोळ पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण तसेच घाटमाथ्यासह विदर्भात या दरम्यान काही ठिकाणी पाऊस झाला. उर्वरित महाराष्ट्रात मात्र अजून कोरडे हवामान आहे. गुरुवारी सकाळपर्यंत सांताक्रूझ येथे कमाल ३२.८ अंश सेल्सिअस, किमान २५.५ अंश सेल्सिअस तर ८३ टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आहे. तर कुलाबा येथे कमाल ३२ अंश सेल्सिअस, किमान २६ अंश सेल्सिअस तर ९० टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आहे.

त्यामुळे रोज घराबाहेर निघणारा सामान्य माणूस ऑक्टोबर हिट’मुळे पुरता होरपळून निघण्यास सुरुवात झाल्याने, जास्तीत जास्त पाणी पिण्याच्या सूचना आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x