22 November 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

NCB Officer Vs Sameer Wankhede | NCB अधिकाऱ्याकडूनच समीर वानखेडेंची पोलखोल सुरु | सरकारला पत्र

NCB Officer Vs Sameer Wankhede

मुंबई, २६ ऑक्टोबर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे. यासोबतच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते (NCB Officer Vs Sameer Wankhede) खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी एक पत्रही ट्विट केलं आहे जे एनसीबीतील एका अज्ञात अधिकाऱ्याकडून त्यांना प्राप्त झाले आहे.

NCB Officer Vs Sameer Wankhede. Nawab Malik, the National Spokesperson of the Nationalist Congress Party (NCP), has once again held a press conference today. Apart from this, serious allegations have also been leveled against NCB officer Sameer Wankhede :

नवाब मलिक यांनी म्हटलं, एनसीबीच्या विरोधात आमची लढाई एनसीबीच्या विरोधात नाहीये. एनसीबीने गेल्या काही वर्षांत खूप काही चांगले काम केले आहे. एनसीबी चांगले काम करत आहे. मात्र एक व्यक्ती बोगस प्रणापत्रावर नोकरीत आला. मागील दोन दिवसांपासून समीर वानखेडे यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 6 तारखेपासुन आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. असं म्हटलं जातंय की, सर्व कुटुंबाला याला खेचले जात आहेत पण आम्ही असे केले नाही. यात हिंदू – मुस्लिम मी आणले नाही, मी कधीही धर्माच्या नावावर राजकरण केलं नाही. ख्रिचन आणि मुस्लीम यांनी धर्म बदलला तर जात समाप्त होते.

नोकरी मिळविण्यासाठी बोगस प्रमाणपत्र:
या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे. ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे नाव आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. पूर्ण परिवार मुस्लिम म्हणुन जगत आहेत, हे सत्य आहे. दलित संघटनांबरोबर आम्ही बोलत आहोत. या बाबतीत दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल. जातवैधता समितीसमोर समीर वानखेडे यांचा दाखला पाठवणार आहोत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

26 प्रकरणांतून फसवणूक:
नवाब मलिकांनी एक पत्र ट्विट केले आहे. हे पत्र एनसीबीतील एका अधिकाऱ्याने पाठवले, नाव गुप्त आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. 26 प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 26 प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी.

बेकायदा फोन टॅपिंग:
समीर वानखेडे यांनी कोणत्या कारणास्तव माझ्या मुलीचा सीडीआर मागितला आहे? वानखेडे स्वत:च्या सीमा पार करत आहेत. समीर वानखेडे फोन टॅप करत आहेत एक मुंबईत आणि ठाण्यातून फोन टॅप केला जात आहे. माझ्या मुलीचा सीडीआर मुंबई पोलिसांकडे मागितला… पण तो पोलिसांनी दिला नाही. आता ही लढाई सुरू राहील. कोणत्या अधिकारात वानखेडे माझ्या मुलीची खासगी माहिती मागत आहेत?

एनसीबी डिपार्टमेण्टन ला नवाब मलिक चा फोबीया झालाय का ? आमची लढाई एनसीबी संस्थेशी नाहीये. मिस्टर दाऊन वानखेडे माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोका मी तुम्हाला आव्हान देतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCB Officer Vs Sameer Wankhede wrote a letter to state government with serious allegation.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x