24 November 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Sameer Dawood Wankhede Nikah Nama | समीर दाऊद वानखेडेंचा 'निकाह नामा' व्हायरल | पोलखोल सुरूच

Sameer Dawood Wankhede Nikah Nama

मुंबई, 27 ऑक्टोबर | महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करीत समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबद्दलची माहिती दिली असून, त्यांच्या कथित निकाहनाम्याची माहिती असल्याचा दावा मलिकांकडून (Sameer Dawood Wankhede Nikah Nama) करण्यात आला आहे.

Sameer Dawood Wankhede Nikah Nama. Malik has three tweets. The first tweet states, ‘Sameer Dawood Wankhede and Sabana Qureshi were married on Thursday, December 7, 2006 at 8 pm. The marriage took place in the Lokhandwala complex in Andheri West :

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असून, त्यांनी खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. मंगळवारी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे हे राजकीय नेते, कलाकार आणि इतर लोकांचे फोन टॅप करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता मलिकांनी वानखेडे यांचा कथित निकाहनामाची माहिती दिली आहे.

मलिक यांनी तीन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘7 डिसेंबर 2006, गुरुवारी रात्री आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांचा निकाह पार पडला होता. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये हा निकाह झाला होता.

दुसऱ्या ट्वीटमध्ये मलिक यांनी आणखी माहिती दिली आहे. ‘निकाहमध्ये 33 हजार रुपये मेहर (पतीकडून देण्यात येणारी रक्कम) म्हणून देण्यात आले होते. या निकाहमधील दुसऱ्या साक्षीदाराचे नाव अजीज खान आहे. अजीज खान यासमीन दाऊद वानखेडे यांचे पती आहे, ज्या समीर दाऊद वानखेडे यांची बहीण आहे’, असं मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तिसऱ्या ट्वीटमध्ये मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सबाना कुरेशी यांचा निकाहवेळीचा फोटो ट्वीट केला आहे. त्याचबरोबर एक कागद ट्वीट केलेला असून निकाहनामा असल्याचा दावा नवाब मलिकांकडून करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sameer Dawood Wankhede Nikah Nama viral on social after Nawab Malik tweet.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x