22 November 2024 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

MHT CET Result 2021 | MHT CET परीक्षेचा निकाल सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार | असा ऑनलाईन पहा

MHT CET Result 2021

मुंबई, 27 ऑक्टोबर | महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विटव्दारे माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी 7. 00 नंतर (MHT CET Result 2021) उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

MHT CET Result 2021. The results of MHT-CET-2021 online entrance test conducted by the State CET for the academic year 2021-22 will be made available on the website https://mhtcet2021.mahacet.org from the login of the candidates after 7.00 pm today :

निकाल कुठं पाहणार?
भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले जातील. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

MHT CET निकाल कसा पाहायचा?
1: महाराष्ट्र CET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2: होम पेजवर तुम्हाला MHT CET स्कोअर कार्डची लिंक मिळेल.
3 : नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या जागेत तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड (जन्मतारीख) यासारखी आवश्यक माहिती भरून लॉग-इन करा.
4: तुम्ही लॉग इन करताच तुमचा निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीनवर पाहायला मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MHT CET Result 2021 will declare today at 7 O Clock.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x