21 November 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Breaking News | देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत | परमबीर सिंहांचं चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र

Breaking News

मुंबई, ०३ नोव्हेंबर | IPS अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर ठाणे कोर्ट आणि मुंबईतील किला न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून परमबीर सिंह (Breaking News) गायब आहेत.

Breaking News. A disturbing news has come out regarding Parambir Singh. Accordingly, he has submitted an affidavit stating that he has no evidence against Anil Deshmukh :

परंतु, आता परमबीर सिंह यांच्यासंबंधित एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. त्यानुसार त्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात आपल्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. मात्र या वृत्ताने राजकीय खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतंय.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंह यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. विशेष म्हणजे त्याची पुष्टी स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी केली आहे. मागील सुनावणीवेळी सिंह यांच्याकडून हे प्रतिज्ञापत्र चौकशी आयोगाकडे सादर केल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. आयोगाकडून सिंह यांच्याविरोधात दोन वेळा समन्स तसेच जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. तरी देखील ते एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर आयोगाने सिंह यांच्यावर जूनमध्ये 5 हजार रुपये आणि दोन वेळा 25 हजार रुपये दंडही ठोठावला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Breaking News Parambir Singh has submitted an affidavit stating that he has no evidence against Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x