22 November 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Bhaubeej 2021 Shubh Muhurat | आज भाऊबीज दिवशी बहिणीने भावाची ओवाळणी करण्यासाठी हे आहेत शुभ मुहूर्त

Bhaubeej 2021 Shubh Muhurat

मुंबई, 06 नोव्हेंबर | आज शनिवार 6 नोव्हेंबर दिवशी भाऊबीज साजरी होणार आहे. भाऊबीज हा दिवाळीच्या धामधूमीमधील शेवटचा सण असतो. या दिवशी बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी यम द्वितिया साजरी केली जाते. बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते. भाऊ-बहीणा ओवाळणी आणि गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो. यंदा पाडवा आणि भाऊबीज एकत्र आल्याने नेमकी भावाची ओवाळणी कधी करायची असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर जाणून घ्या भाऊबीज 2021 मधील यंदाचा (Bhaubeej 2021 Shubh Muhurat) भावाच्या ओवाळणीचा नेमका मुहूर्त कधी आहे?

Bhaubeej 2021 Shubh Muhurat. In Hinduism, it is customary to celebrate all the important days of festivals by seeing these auspicious moments. So, if you are going to celebrate the festival of Bhaubeej at an auspicious time this year :

हिंदू पुराणातील कथांनुसार, मृत्यूदेव यम हे आपली बहीण यमी हिच्याकडे जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन , भोजनाचा आनंद घेऊन आले होते तो दिवस म्हणजे यमद्वितिया. त्यामुळे आजही भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन या दिवसाचा जिव्हाळा जपतो. बहिणीकडे जेवण करून, ओवाळणी करून घेऊन तिला भेटवस्तू देऊन त्यांच्यामधील नात्याचा गोडवा वृद्धिंगत करतो. यासाठी प्रार्थना केली जाते.

ओवाळणीच्या शुभ मुहूर्ताची वेळ काय आहे?
भाऊबीजेचा सण कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला साजरा होत असल्याने तो यम द्वितीया म्हणून देखील ओळखला जातो. द्रिक पंचागच्या माहितीनुसार, यंदा भाऊबीजेसाठी टीका लावून ओवाळणी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारच्या वेळेस 1 वाजून 30 मिनिटं ते 3 वाजून 46 मिनिटं आहे. या 2 तास 11 मिनिटांच्या काळात तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता. तर यंदा दिवाळीत यम द्वितीया तिथी 5 नोव्हेंबरला रात्री 11 वाजून 14 मिनिटांनी सुरू होणार असून 6 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजून 44 मिनिटांनी संपणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bhaubeej 2021 Shubh Muhurat on 06 November 2021.

हॅशटॅग्स

#diwali(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x