16 April 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

BREAKING | केंद्रीय कृषी कायदे रद्द | शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मोदींना माफी मागायला भाग पाडलं

Repeal of 3 agricultural laws

मुंबई, 19 नोव्हेंबर | केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी (Repeal of 3 agricultural laws) यांनी आज केली.

The central government has finally taken notice of the farmers’ agitation that has been going on for the last several months. Prime Minister Narendra Modi today announced the repeal of 3 agricultural laws :

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी देशाला संबोधित केलं. गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर तिन्ही कायद्यांचं महत्त्व पटवून देण्यात सरकार म्हणून कमी पडलो असल्याचं सांगत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पाच दशकांच्या सार्वजनिक आयुष्यात मी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांची आव्हान जवळून बघितली आहेत. त्यामुळे जेव्हा देशाने मला पंतप्रधानपदाची संधी दिली. तेव्हा शेतकऱ्यांच्या कल्याणाला आम्ही प्राधान्यक्रम दिला. देशात १०० पैकी ८० शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. त्यांची संख्या १० कोटींहून अधिक आहे. ही माहिती बऱ्याचजणांना माहिती नाही.

याच जमिनीच्या तुकड्यावर ते स्वतःचा आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवतात. पिढ्यानपिढ्या कुटुंबियांत होणारी जमिनीची विभागणी जमिनीचे आणखी तुकडे करत आहेत. त्यामुळे सरकारने बियाणांपासून सर्वच बाबींवर काम केलं आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडलं आहे”, असं मोदी म्हणाले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडल्याची कबुलीही दिली. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेने चांगली नियत ठेवून आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. एक वर्ग विरोध करत होता. ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अनेकांनी त्यांना या कायद्याचं महत्त्वं सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आणि तर्कही जाणून घेतली. त्यात कसूर ठेवली नाही, असं ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Repeal of 3 agricultural laws PM Narendra Modi made announcement.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या