22 November 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मलिक यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांना रोखलं जाऊ शकत नाही | डीके वानखेडेंच्या याचिकेवर हायकोर्टाची टिपणी

Bombay high court refused to restrain Nawab Malik

मुंबई, २२ नोव्हेंबर | अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे, त्यांचे वडील डीके वानखेडे यांच्याबद्दल काही कागदपत्रे आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती. मलिक यांना अशा प्रकारच्या पोस्ट करण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका डीके वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने मागणी फेटाळून लावत, अशा प्रकारचे ट्वीट करण्यापूर्वी त्याबद्दल पुरेश पडताळणी करून घ्यावी अशी सूचना नवाब मलिक यांना (Bombay high court refused to restrain Nawab Malik) केली आहे.

Bombay high court refused to restrain Nawab Malik. DK Wankhede had filed a petition in the Mumbai High Court. The court rejected the demand and directed Nawab Malik to conduct a thorough investigation before making such a tweet :

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर डीके वानखेडे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर सुनावणी झाली. “महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी सोशल मीडियातून केलेल्या पोस्ट द्वेष आणि वैयक्तिक वैराच्या भावनेतून केले गेले. मात्र, त्यांना सोशल मीडियावर करण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. कारण मलिक यांनी खुप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे”, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिका आणि साक्षीदार प्रभाकर साईलच्या पत्रासह विविध कागदपत्रांची पाहणी केली. समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांसंदर्भातील कागदपत्रांचा यात समावेश होता. ‘मलिक यांनी ट्वीट करण्यापूर्वी काळजी घेतली नाही. मात्र त्यांनी केलेले आरोप खूप गंभीर आहेत’, असं न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.

वानखेडे यांना गोपनियतेचा अधिकार आहे. पण त्याचबरोबर मलिक यांनाही बोलण्याचा अधिकार आहे. यात समतोल साधण्याची गरज आहे, असंही न्यायमूर्ती माधव जमादार म्हणाले. त्यामुळे डीके वानखेडेंना दिलासा मिळू शकला नाही. दरम्यान, या अब्रनुकसानीच्या खटल्याची पुढील सुनावणी 28 डिसेंबर रोजी होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bombay high court refused to restrain Nawab Malik from making a tweet over petition of DK Wankhede.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x