6 April 2025 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Foreclosure | पगारदारांनो, वेळेपूर्वी गृहकर्ज बंद करण्यापूर्वी नुकसान समजून घ्या, या 3 गोष्टी दुर्लक्षित करू नका Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपचा बहुचर्चित IPO लाँच होतोय, अशी संधी सोडू नका - IPO GMP Horoscope Today | 06 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 06 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | उच्चांकापासून 55 टक्क्यांनी घसरला आहे शेअर, स्वस्तात खरेदी केल्यास पुढे किती कमाई? - NSE: IREDA Vedanta Share Price | ही आहे टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर वेदांता शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: VEDL Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक प्राईस 2 रुपये 39 पैसे, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VIKASECO
x

अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर

बहराइच : गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले करून त्यांना गुजरातबाहेर पळवून लावणाऱ्या आमदार अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपी बिहारचा असल्याचे समोर येताच उत्तर भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले तसेच त्यांना गुजरात सोडण्याचे आदेश हिंसक जमावाकडून देण्यात आले होते.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय समाज गुजरातमधून पलायन करू लागल्याने त्याचा राग व्यक्त करत उत्तर प्रदेशमध्ये अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’ संघटनेने यासंदर्भातील पोस्टर्स जिल्ह्यात ठिकठिकाणी लावले आहेत असं वृत्त आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पोलिसांनी हे पोस्टर्स हटवून समाजात असंतोष पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आमदार अल्पेश ठाकोर आणि त्यांचे कार्यकर्ते हे राक्षसी प्रवृत्तीचे असून ते गरीब उत्तर भारतीय कामगारांना अमानुष मारहाण करतात. हे लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’चे राष्ट्रीय अध्यक्ष भवानी ठाकूर यांनी सांगितलं. तसेच ठाकोरचा शिरच्छेद करणाऱ्यांला आम्ही १ कोटीचे बक्षीस जाहीर केले असून त्यासंदर्भात जागोजागी पोस्टर्स लावले आहेत. जर ठाकोर गुजरात सोडून बाहेर जाणार नसतील तर आम्ही गुजरातमध्ये घुसून त्यांचे शिरच्छेद करू असे ठाकूर यांनी म्हटलं आहे असं वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या