5 April 2025 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खाजगी कंपनी नोकरदारांनो, सॅलरी लिमिट वाढणार, EPF पेन्शन मध्ये वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Gold Mutual Fund | होय खरं आहे, या गोल्ड स्कीम 1 वर्षात 31 टक्के ते 33 टक्का परतावा देत आहेत, इथे पैशाने पैसा वाढवा ChatGPT Aadhaar Card | ChatGPT तुमचा फेक आधार-पॅन कार्ड बनवतोय, उत्साही Ghibli AI युझर्सचं बँक अकाउंट खाली होईल Horoscope Today | 05 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 05 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पडझडीतही तज्ज्ञांचा विश्वास कायम, पुढील टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं? - NSE: RPOWER Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर स्वस्तात खरेदी करून ठेवा, पुढे मोठा परतावा मिळेल, संधी सोडू नका - NSE: JIOFIN
x

राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; खोट्या विहिरींची राज ठाकरेंकडून पोलखोल

मुंबई : सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे आणि ग्रामीण भागावर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि १ लाख २५ हजार विहिरी बांधल्याचा दावा सुद्धा त्यामुळे फसवा ठरल्याने राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना लक्ष केले आहे.

दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेला दावा तसेच उपाययोजना फोल ठरल्याचं समोर येत आहे. जलयुक्त ‘शिव्या’र या नावाने प्रसिद्ध केलेल्या आजच्या व्यंगचित्रात सरकारच्या या कुचकामी आणि फोल ठरलेल्या धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्र तहानला आहे, असा टोला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्राद्वारे लगावला आहे

विशेषम्हणजे मराठवाडय़ातील पाणीसाठा जेमतेम २७.७९ टक्के इतकाच शिल्लक असून नाशिक विभागातील पाणीसाठा ६४.९५ टक्के इतका आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने दडी मारल्याने तेथील शेती मोठ्या प्रमाणावर संकटात सापडली आहे. दरम्यान, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या १ लाख २५ हजार विहिरी बांधल्याचा दाव्याची राज ठाकरे यांनी पोलखोल केली आहे असच म्हणावं लागेल.

काय आहे ते नेमकं व्यंगचित्र?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या