21 April 2025 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

LPG Cylinder Prices December 1 | महागाईचा फटका | आजपासून LPG 100 रुपयांनी महाग | तुमच्या शहरातील दर तपासा

LPG Cylinder Prices December 1

मुंबई, 01 डिसेंबर | डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस असून महागाईचा मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १ डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 103.50 रुपयांनी वाढ केली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100.50 रुपयांनी वाढ झाली आहे. येथे आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2101 रुपये (LPG Cylinder Prices December 1) झाली आहे.

LPG Cylinder Prices December 1. Big shock of inflation. Government oil marketing companies have increased the prices of LPG Gas Cylinder from 1st December :

आता या आहेत व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती:
आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरने २१०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दोन महिन्यांपूर्वी ते 1733 रुपये होते पण 1 डिसेंबर 2021 ला त्याची किंमत 2101 रुपयांवर गेली आहे. मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2051 रुपयांचा झाला आहे. त्याचबरोबर कोलकात्यात 19 किलोचा इंडेन गॅस सिलिंडर 2174.50 रुपयांचा झाला आहे. चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी 2234 रुपये मोजावे लागतील.

LPG-Cylinder-Prices

ही आहे घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत:
जर आपण घरगुती एलपीजी सिलिंडरबद्दल बोललो, तर दिल्लीमध्ये 14.2 किलोचा विनाअनुदानित गॅस सिलिंडर केवळ 899.50 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईत सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये याची किंमत 926 रुपये आणि चेन्नईमध्ये 915.50 रुपये आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एलपीजीच्या किमतीत अखेरची वाढ 6 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LPG Cylinder Prices December 1 increased by Rs 100.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LPG(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या