3 April 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | संयम ठेवा, जिओ फायनान्शिअ शेअर देईल मोठा परतावा, अपडेट नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | दणादण परतावा मिळेल, सिटी ब्रोकिंग फर्मने दिले संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IDEA Rattan Power Share Price | पावर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 1 महिन्यात 17.39 टक्के परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर फोकसमध्ये - NSE: IREDA Suzlon Share Price | 2,855 टक्के परतावा दिला, सुझलॉन शेअरची टार्गेट प्राईस नोट करा, संधी सोडू नका - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

'५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’, मोदींना राष्ट्रवादीचे खोचक प्रश्न

मुंबई : एनसीपीने आपल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आता थेट पंतप्रधानांना लक्ष्य करत त्यांच्या परदेश वारी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. लवकरच पंतप्रधानांच्या परदेश वारीचे शतक पूर्ण होत असले तरी देशाने त्यातून काय साधले असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना विचारला आहे. युपीएच्या काळात ९ वर्षात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. तर दुसरीकडे मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आज पर्यंत तब्बल १४७४ कोटी रुपये खर्च झाले तरी त्यातून देशाला काय सध्या झालं असा सवाल केलं आहे.

#जवाबदो हॅशटॅग वापरून मोदींना रोज एक प्रश्न विचारला जात आहे. तसेच ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ म्हणत मागील दीड महिन्यापासून एनसीपीकडून राज्य तसेच केंद्र सरकारला लक्ष करण्यात येत आहे. त्यातील आज ४२वा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीने ट्विट करत म्हटलं आहे की, मोदींच्या विदेश दौऱ्यांवर जवळपास १,४७४ कोटी इतका प्रचंड पैसा खर्च झाला आहे. आता लवकरच त्यांच्या विदेश दौऱ्यांचे शतक सुद्धा पूर्ण हीनार आहे. त्याला अनुसरून एनसीपीने पंतप्रधानांना लक्ष केलं आहे.

दरम्यान, मोदींच्या या विदेश दौऱ्यांमुळे भारताला नक्की कोणता फायदा झाला आहे?” असा प्रश्न ट्विट मध्ये विचारण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलला टॅग सुद्धा करण्यात आले आहे. दरम्यान त्यासाठी राष्ट्रवादीने व्यंगचित्राचा सुद्धा आसरा घेतला आहे.

काय आहे ते नेमकं ट्विट?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या