3 April 2025 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर फोकसमध्ये - NSE: IREDA Suzlon Share Price | 2,855 टक्के परतावा दिला, सुझलॉन शेअरची टार्गेट प्राईस नोट करा, संधी सोडू नका - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, शेअर प्राईस 82 रुपये, पुढे होईल मोठी कमाई - NSE: HFCL Vedanta Share Price | एमके ग्लोबल बुलिश, हि आहे पुढची टार्गेट प्राईस, वेदांता शेअर मालामाल करणार - NSE: VEDL Trident Share Price | टेक्सटाईल शेअर फोकसमध्ये, मार्केट तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TRIDENT
x

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन

वॉशिंग्टन : बिल गेट्स यांचे मित्र आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे ६५ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. मागील अनेक वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते. अॅलन यांनी त्यांचे लहापणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासोबत जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.

पॉल अॅलन क्रीडा रसिक सुद्धा होते. पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि सिएटल सिहॉक्सचे प्रमुख होते. १९७५ मध्ये एकत्र येत अॅलन आणि बिल गेट्स या दोन मित्रांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. १९८० मध्ये स्थापन झालेली मायक्रोसॉफ्ट कंपनी सॉफ्टवेअर जगतातील प्रतिष्ठित कंपनी म्हणून पुढे आली. दरम्यान, आयबीएम कंपनीने सुद्धा पर्सनल कॉम्प्युटर क्षेत्रात प्रथमच प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यानंतर आयबीएमने मायक्रोसॉफ्टला पर्सनल कॉम्प्युटरसाठी महत्वाच्या ऑपरेटिंग सिस्टिम पुरवण्याचे काम दिले होते. त्यानंतर त्यांचं जगच पालटलं होत.

त्याच निर्णयामुळे आज मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकन कंपनी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानात जगात अव्वल स्थानी पोहोचली. आज अॅलन आणि गेट्स हे दोघेही अब्जाधीश म्हणून परिचित आहेत. कालांतराने दोघाही मित्रांनी स्वतःला समाजकार्याशी जोडून घेतले होते. दोघांनी अनेक स्वयंसेवी संस्था स्थापन करुन जगभरात विविध विकासकामांना त्यामार्फत निधी पुरवला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या