25 November 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620
x

बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही, पहिल्यांदा अापल्या वडीलांचं स्मारक बांधावं

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर राम मंदिरावरून बोचरी टीका केली आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या हातात असताना अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी पहिल्यांदा अापल्या जन्मदात्या वडीलांचं स्मारक बांधावं. त्यानंतर जनतेला त्यांच्याबद्दल खात्री पटेल. लाेकांना राम मंदिराच्या नावाने भावनिक आवाहन करून राजकरण करण्याचा खेळ सुरु आहे असं अजित पवार म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुखांमध्ये जर धमक असेल तर त्यांनी अयाेध्येला राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे खुलं अाव्हानच अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

विविध मागण्यांसाठी कॅम्पातील मेमाेरिअल हाॅलपासून विभागीय अायुक्त कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे आज पुण्यात माेर्चा काढण्यात अाला असता उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, शिवसेनेकडून मंदिराचं राजकारण निवडणूका डाेळ्यासमाेर ठेवूनच केलं जात आहे. जर यांना राम मंदिर करायचं असतं तर ४ वर्ष हाेऊन गेले भाजप-शिवसेनेच्या युती सरकारला सत्तेत येऊन तर यांना ४ वर्ष राम मंदिर बांधण्यापासून काेणी अडवलं होतं का? असा खडा सवाल उपस्थित केला. सत्ताकाळाच्या ४ वर्षात त्यांना हवं ते करुण घेणं शक्य होते. परंतु, केवळ निवडणूकीच्या तोंडावर भावनिक मुद्दे काढून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत असं ते म्हणाले.

शिवसेना पक्ष नेहमी दुटप्पी भूमिका घेते. शिवसेना म्हणते कर्जमाफी मध्ये भ्रष्टाचार झाला. आणि मग जर भ्रष्टाचार झाला तर शिवसेनेचे मंत्री काय करत हाेते. त्यांनी ताे उघड करून लोकांसमोर का अाणला नाही. अाज सामान्य जनता प्रचंड त्रासलेली अाहे. त्यामुळे वाढत्या महागाईला भाजप साेबत शिवसेना सुद्धा जबाबदार अाहे. युती सरकारच्या सगळ्या अपयशांमध्ये शिवसेना सुद्धा तितकीच वाटेकरी अाहे. असेही पवार यावेळी म्हणाले. राज्य सरकारने ताबडतोब दुष्कार जाहीर करावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत करावी आणि भारनियमन रद्द करावे, वाढती बेराेजगारी दूर करण्यासाठी तात्काळ पाऊले उचलावीत, अशा सर्व मागण्यांसाठी पुण्यात विशाल आयोजित केला होता.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x