19 April 2025 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL
x

अमित शहा आणि मोहन भागवत यांच्यात भेट, राम मंदिरावर चर्चा?

मुंबई : आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद आदी महत्वाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याकरिता मोदी सरकारवर दबाव आणला असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे. या बैठकीत राम मंदिर तसेच शबरीमला मंदिर अशा मुद्यावर बराचवेळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतरच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिर उभारणीसाठी थेट अध्यादेश लागू करण्याची मागणी मोदी सरकारकडे केल्याचे समजते. तसेच अयोध्येतील विवादित जागेवर राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारनं थेट कायदा करावा, असं सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे म्हटलं होतं.

याच विषयाला अनुसरून भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतं आहे. अमित शहा आणि मोहन भागवत या दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेत मुख्य म्हणजे राम मंदिर आणि शबरीमला मंदिर मुद्यावर चर्चा झाल्याचं समोर येत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या