22 November 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

२०१४ प्रमाणे कोणतीही लाट नसेल, तर २०१९ मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म महत्वाच्या भूमिकेत

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या २०१४ मधील विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची भूमिका मांडली आहे. दरम्यान, बोलताना ते म्हणाले की नरेंद्र मोदी हे मोठे नेते असले तरी २०१९ मध्ये २०१४ प्रमाणे कोणतीही लाट नसेल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच २०१९ मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तरी त्यांना एकट्याला २७२ जागा मिळणे कठीण असल्याचेच म्हटले आहे.

तसेच २०१४ सारखी लाट आता अधिक अडचणीत असल्याचे ठळक पणे जाणवत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. भाजपाचे निवडणूक रणनीतीकार राहिलेले व सध्या जेडीयू’चे उपाध्यक्ष असून बिहार निवडणुकीत ते आता नितीश कुमार यांच्यासाठी राबताना दिसतील. आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या तरी भारतीय जनता पक्ष जरी आघाडीवर असाल तरी प्रत्यक्ष निवडणुकीत शेवटचे १० ते १२ दिवस सुद्धा एखाद्या पक्षाचं चित्र पालटून टाकतात.

दरम्यान, २०१४ पासूनच्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या अनेक राजकीय बदलांबाबत ते म्हणाले, आता सामान्य लोक वस्तुस्थिती आणि दिलेल्या आश्वासनांवर अधिक बोलू इच्छितात. सामान्यांना आता खोटी आश्वासने नकोत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणतीही लाट नसेल हे निश्चित. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही छोट्या-छोट्या मुद्यांवर लढली जाईल. त्यामुळे २०१९ मध्ये मतदार उमेदवारांना पाहूनच मतदान करतील असं मत व्यक्त केले आहे.

२०१९ मध्येही डिजिटल प्लॅटफॉर्म अत्यंत महत्वाची भूमिका बजावतील. कारण, २०१४ मध्ये देशात ४ ते ५ कोटी स्मार्टफोन्स होते. परंतु आता तीच संख्या वाढून तब्बल ३५ ते ४० कोटी इतकी झाली आहे. असे असले तरी सुद्धा देशातील ५० टक्के मतदार हा आज सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय नाही. तरी सुद्धा समाज माध्यमं आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावेल. दरम्यान, देशात नव्याने होऊ घातलेल्या महाआघाडीबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, एकट्या पक्षाला आगामी निवडणुका जिंकणे सोपे नसेल. त्यामुळे विजयासाठी मोठी आघाडी गरजेची आहे. परंतु, या आघाडीचा काहीतरी उद्देश किंवा ध्येय असले पाहिजे आणि त्यांची दिशा सुद्धा निश्चित हवी, ज्यामुळे मतदाराला त्या आघाडीचे नेमके उद्देश समजल्यास होकारात्मक निकाल दिसतील.

सध्याच्या देशभर पेट घेत असलेल्या राम मंदिराच्या मुद्यावरून जेडीयूच्या भूमिकेवर ते म्हणाले, केवळ निवडणुकांवेळी राजकीय पक्ष असे मुद्दे उपस्थित करतात. परंतु, राम मंदिरचा निर्णय हा सुप्रीम कोर्टावर सोडला पाहिजे. तसेच सर्वांनी न्याय व्यवस्थेच्या निर्णयाचा सुद्धा सन्मान केला पाहिजे. आघाडीत काही मुद्दे असे असतात की त्यावर तुम्ही सहमत होता आणि काहींवर सहमती होत नाही. परंतु, एक स्वतंत्र पक्ष या नात्याने आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. केवळ २ लोकसभा सदस्य आणि ४ ते ५ राज्यसभा सदस्यांच्या जोरावर आम्ही भारतीय जनता पक्षाला रोखू अशी स्थिती सध्यातरी नाही. परंतु आम्ही आवाज उठवतच राहणार.

सुरुवातीला प्रशांत किशोर हे भारतीय जनता पार्टीत दाखल होतील अशी चर्चा रंगली होती. परंतु, त्यांनी थेट नितीश कुमार यांच्या जेडीयूत प्रवेश केला. याविषयाला अनुसरून ते म्हणाले की, मला बिहारमध्ये काम करायचे होते. त्याचबरोबर नितीशकुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये केलेल्या कामांमुळे मी अत्यंत प्रभावित झालो. नितीशकुमार हे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. जेडीयू एक छोटा पक्ष आहे. विचारधारेबाबत बोलायचे म्हटले तर त्यांची पाटी अजून स्वच्छ आहे. त्यामुळेच मी या पक्षात आलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x