मोदीजी ‘माझ्याशी केवळ १५ मिनिटे ‘राफेल’वर खुली चर्चा करा’ : राहुल गांधी
छत्तीसगड : छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप तसेच मोदींवर तुफान टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शनिवारी सरगुजा येथे आयोजित एका रॅलीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट मोदींनी राफेल करारावर केवळ १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी असं खुलं आव्हान दिलं. त्यांनी केवळ १५ मिनिटं माझ्याबरोबर राफेलच्या विषयावर बोलू द्यावं आणि त्यानंतर तेवढ्याच वेळ स्वतः सुद्धा त्याविषयी बोलावं असं राहुल गांधी म्हणाले. राफेल लढाऊ विमानांच्या कराराद्वारे मोदींनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला तब्बल ३०,००० कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काल राहुल गांधी यांची छत्तीसगड येथे शेवटची प्रचारसभा पार पडली. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नोटाबंदी, कर्ज बुडवणारे उद्योजक अशा विषयांवरून मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा करुन लोकांच्या अडचणी वाढवल्या. परंतु, श्रीमंत उद्योजकांना त्यांनी मोठा दिलासा दिला. मोदींनी श्रीमंत उद्योगपतींचे तब्बल ३. ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. परंतु, गरीब शेतकऱ्यांचे कोणतेही कर्ज त्यांनी माफ केले नाही, असा घणाघात केला.
छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर केवळ १० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे काँग्रेस अध्यक्षांनी जाहीर केले. तसेच कर्जमाफीसाठी पैसे कुठून आणणार, याचे उत्तर सुद्धा उपस्थितांना दिले. ‘पंतप्रधान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा लोकांकडून आम्ही पैसे वसूल करु आणि गरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितले.
I challenge Modi ji to come on stage anywhere,anytime&debate over #Rafale. I’ll talk about Ambani, HAL&French President’s statements.I’ll say that Def Min said clearly that it’s PM who did it. CBI Director was removed at 2 am.He’ll not be able to answer my questions: Rahul Gandhi pic.twitter.com/LC8rvELd8m
— ANI (@ANI) November 17, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार