23 November 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

PMSYM | या सरकारी योजनेत दररोज 2 रुपये जमा करून 36000 मिळवा | अशी आहे अर्जाची प्रक्रिया

PM Shram Yogi Maandhan Yojana

मुंबई, 05 फेब्रुवारी | 2019 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना (PM Shram Yogi Maandhan Yojana-PMSYM) सुरू केली होती. PMSYM ही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एक सरकारी योजना आहे. या योजनेच्या मदतीने देशातील मजुरांना सरकारकडून दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर.

PMSYM PM Shram Yogi Maandhan Yojana is a government scheme for social security of workers in the unorganized sector. A pension of Rs.3000 is given every month to the laborers of the country :

दरमहा 3000 रुपये मिळणार आहेत :
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील ४२ कोटी मजुरांना लाभ मिळणार आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात, त्यांना 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरावा लागेल. वयाची ६० ओलांडल्यानंतरच कामगारांना पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, मजुरांना दरमहा 3,000 रुपये म्हणजे वार्षिक 36,000 रुपये मिळतील.

प्रधानमंत्री मानधन योजनेची पात्रता :
* वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
* करदाते या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.
* EPFO, NPS आणि ESIC अंतर्गत समाविष्ट केले जाऊ नये.
* अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु.15000 पेक्षा कमी असावे.
* अर्जदाराचे स्वतःचे बचत बँक खाते किंवा जन धन बँक खाते असणे आवश्यक आहे.
* यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, हेड लोडर्स, वीटभट्ट्या, मोची, चिंध्या वेचणारे, घरकाम करणारे, धोबी, रिक्षाचालक, ग्रामीण भूमिहीन मजूर, शेतमजूर, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार इत्यादींचा समावेश होतो.

अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या :
१. maandhan.in/shramyogi येथे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत लॉग इन करा.
२. होम पेजवर, ‘आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा’ या लिंकवर क्लिक करा, त्यानंतर सेल्फ एनरोलमेंटवर क्लिक करा.
३. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि Proceed वर क्लिक करा.
४. आता तुम्हाला अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, कॅप्चा कोड भरल्यानंतर ओटीपी मिळेल, तो भरा.
५. त्याची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर ते प्रिंट केल्याची खात्री करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Shram Yogi Maandhan Yojana application process.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x