22 November 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

सुनील अरोरा यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती

नवी दिल्ली : विद्यमान निवडणूक आयुक्त सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील असं वृत्त आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांच्या जागी त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. स्वतः निवडणूक आयोगाने सोमवारी या नियुक्तीची अधिकृत बातमी दिली आहे. पुढील महिन्यात म्हणजे दोन डिसेंबरला अरोरा अधिकृतपणे त्यांचा पदभार स्वीकारतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त १ डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे.

अरोरा हे १९८० च्या बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. मागील वर्षी म्हणजे ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, विधी मंत्रालयाने काल म्हणजे सोमवारी त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर अखेरच्या परवानगीसाठी तो राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल विधी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

६२ वर्षीय अरोरा यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अशा महत्वाच्या पदावर काम केले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x