21 April 2025 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या
x

ज्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात: खडसे

जळगाव : ज्या नेत्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात असल्याची खंत आज पुन्हां एकनाथ खडसें यांनी बोलून दाखवली. जळगाव जिल्हातील बोदवड इथं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोणशिला प्रसंगी खडसे बोलत होते.

ज्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर लाठ्या – काठ्या खाल्या आणि राज्यात भाजपचा वटवृक्ष केला त्यांनाच आज उन्हात केलं आहे. जर माझ्यावरच्या आरोपांवर सरकारकडे सबळ पुरावे असतील तर त्यांनी ते जनतेसमोर ठेवावे असे ही ते उपस्थितांना संबोधताना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी काँग्रेस चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी ही एकनाथ खडसे यांनी अशीच खदखद व्यक्तं केली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony