24 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259
x

भारताचा सर्वात अवजड उपग्रह जी.सॅट-११ चं यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती

नवी दिल्ली : भारताचं सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच जी.सॅट-११ चं आज अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तब्बल ५,८५४ वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी पहाटे युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. दरम्यान, हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो भारतातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल आणि त्यामुळे देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होण्याची आशा आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह इतका विशाल आहे की, प्रत्येक सोलार पॅनल ४ मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुम एवढा असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, याअगोदर म्हणजे वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल महिन्यात याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून पुन्हा मागवला होता. जीसॅट-६ए च्या अयशस्वी प्रयत्नानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास जीसॅट-६ए नियंत्रणाच्या बाहेर गेला होता आणि २९ मार्चला त्याचे प्रक्षेपण होताच त्याचा पूर्णपणे संपर्क तुटला होता.

यानंतर जीसॅट-११ चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि काळजीपूर्वक तपासण्या केल्यानंतरच जीसॅट-११ चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील देण्यात आला. हा उपग्रह म्हणजे भारतातील इंटरनेट जगतातील मोठा गेम चेंजर ठरेल असा वैज्ञानिकांचा दावा केला आहे. त्यामुळे हा उपग्रह कार्यरत होताच देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. जीसॅट-११ च्या सहाय्याने प्रति सेकंदाला १०० गीगाबाइट पेक्षा अधिक ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य होईल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x