22 November 2024 12:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात भाजपचे मंत्री | पण आता फडणवीसांच्या दाऊद-दाऊद, बॉम्बस्फोट-बॉम्बस्फोट कांगाव्यामागील कारणं

Devendra Fadnavis

मुंबई, 05 मार्च | महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. अशावेळी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांसोबत जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं लावून धरली. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय.

मात्र भाजपमधील अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार यामागे फडणवीस आणि भाजप दिल्लीश्वरांची मोठी शिस्तबद्ध रचली गेलेली राजकीय योजना असल्याचं समजलं आहे. विशेष म्हणजे एखाद्या विषयात माध्यमांसमोर वारंवार कांगावा करताना कोणते शब्दप्रयोग करायचे हे देखील निश्चित करण्यात आलं आहे. ते कांगावा शब्दप्रयोग ‘दाऊद-दाऊद” आणि “मुंबई बॉम्बस्फोट-मुंबई बॉम्बस्फोट” आणि “मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले” वगैरे वगैरे. विरोधी पक्षनेते फडणवीस आज जरी नवाब मलिक यांचा दाऊदच्या नातेवाईकांशी संबंध असल्याचा कांगावा करत असले तरी वास्तविक त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री गिरीश महाजन यांनी काही भाजप नेते आणि पोलिसांसहित दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला मंत्री पदावर असताना हजेरी लावली होती. अगदी दाऊदच्या त्या नातेवाईकांसोबत त्यांनी एकाच टेबलवर शाही जेवण देखील केले होते.

फडणवीस यशस्वी झाल्यास :
सत्ताधाऱ्यांनी आधीच आपल्याविरुद्ध बनावट केस बनवून भाजप केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत महाविकास आघाडीतील मंत्र्यांना अडकवत असल्याचा आरोप केला आहे. मात्र भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुखानंतर नवाब मलिक यांना अडकवून आणि त्यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाग पाडणे हेच फडवणीस आणि दिल्लीतील भाजप वरिष्ठांचे ध्येय आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर फडणवीस आणि त्यांच्या दिल्लीश्वरांना ‘राजकीय दहशत; निर्माण करायची आहे आणि सरकार पडायचं आहे अशी माहिती नाव न सांगण्याचा अटीवर भाजपच्या गोटातून प्राप्त झाली आहे.

मात्र महाविकास आघाडीतील मंत्री आणि प्रमुख नेते फडणवीसांच्या या राजकारणाला बळी पडल्यास त्याची मोठी राजकीय किंमत त्यांना भोगावी लागू शकते. त्यामुळेच महाविकास आघाडीतील अनुभवी नेत्यांनी हे ओळखलं असून फडणवीसांना जशास तसे उत्तर देण्याची जोजना आखली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आता ED, IPS आणि एनसीबीतील त्या अधिकाऱ्यांना देखील पुराव्यानिशी उघडं पाडण्याची योजना आखत आहे जे भाजपच्या रणनीतीत सामील आहेत. नवाब मलिक त्यात आघाडीवर होते आणि परिणामी त्यांना घाईघाईत आणि अचानक अटक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांना माध्यमांसमोर कांगावा करत मांडलेला आकडा ५५ लाखावरून ५ लाखांवर आला आहे आणि तो देखील न्यायालयात. त्यामुळे ईडीचं नेमकं काय सुरु आहे याचा अंदाज येऊ शकतो.

कट्टर दाऊद विरोधक फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांचा राजीनामा घेतला नाही :
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यात एक दाऊदच्या नातेवाईकांच्या संबंधित वाद पुन्हा डोकं वर काढत आहे आणि त्यासाठी कारण ठरलं आहे फडणवीसांचा सध्याचा दाऊद-दाऊद, बॉम्बस्फोट-बॉम्बस्फोट नावाने होणार कांगावा आणि निमित्त आहे नवाब मलिक. मात्र भाजपच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार यामागे फडवणीस दिल्लीतील वरिष्ठांच्या आशीर्वादाने राबवत असलेली राजकीय योजना असल्याचं वृत्त आहे.

कांगावा ठळक होण्यासाठी मलिक यांना अधिवेशनाच्या आधी अटक करणे योजनेचा भाग?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अधिवेशनाच्या काळात अडचणीत आणून फडणवीसांनी असाच माध्यमांसमोर कांगावा केला होता. त्यासाठी काही ठराविक वृत्त वाहिन्यांना देखील मॅनेज करण्यात आले होते असं माध्यमातील कुजबुजीत समोर आलं होतं, पण त्याची चर्चा झाली नव्हती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमदारांच्या बैठकी झाल्या आणि त्यावेळी एक राजकीय योजना शिजल्याच म्हटलं जातंय. नवाब मलिक यांनी फडणवीसांसहित संपूर्ण भाजपचा घाम काढला होता. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी फिल्डिंग लावल्याचं भाजपच्या गोटातूनच समोर आलं आणि ठरल्याप्रमाणे फडणवीसांनी दाऊद-दाऊद, बॉम्बस्फोट-बॉम्बस्फोट असा कांगावा सुरु केला आहे. अधिका अधिक मंत्र्यांचे राजीनामे घेत सर्व मंत्रिमंडळ डागाळलेलं आहे असं चित्र उभं करण्याची फडणवीस टीमची (आ. भातखळकर, आ. शेलार, आ. पडळकर, नितेश आणि निलेश राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन आणि किरीट सोमैय्या) राजकीय योजना असल्याचं याच भाजपच्या गोटातून समजलं आहे. पुरावे आणि कागदोपत्री नवाब मलिक यांना अधिक दिवस कोठडीत ठेवता येणं शक्य नसल्याने फडणवीस टीमने कमी वेळ असल्याचं लक्षात ठेवून मुंबईत मोर्चाची योजना आखली आहे. संपूर्ण वातावरण नवाब मलिक यांच्या भोवती कायम ठेवण्यासाठी किरीट सोमय्यांना इतर मंत्र्यांविरुद्धचा “कांगावा” सध्या माध्यमांसमोर न करण्याचे आदेश देण्यात आल्याचं वृत्त आहे.

फडणवीस मुख्यमंत्री असताना नेमकं काय घडलं होतं (मे २०१७ ) :
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे तत्कालीन आरोग्य आणि शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि दहा पोलीस एका गंभीर वादात सापडले होते. गिरीश महाजन हे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्या दाऊद-दाऊद, बॉम्बस्फोट-बॉम्बस्फोट असा माध्यमांच्या माईक समोर वारंवार येऊन कांगावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. १९ मे २०१७ रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला महाराष्ट्र पोलिस दलातील दहा पोलिस कर्मचारी आणि गिरीश महाजन यांनी हजेरी लावल्याचा आरोप होता.

गिरीश महाजन, भाजप नेते आणि पोलिसही लग्नात सामील झाले होते :
दहा पोलिसांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त आणि 9 निरीक्षक दर्जाचे पोलिस या लग्नात सहभागी झाले होते. दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला महाजन हे एकमेव नेते नव्हते, त्याशिवाय भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे, नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि उपमहापौर प्रथमेश गीते (दोघेही भाजपचे) आणि अनेक स्थानिक नगरसेवक लग्न समारंभात उपस्थित होते.

त्या १० पोलिसांच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले होते :
नाशिक पोलिस आयुक्तांनी दाऊदच्या लग्नात सहभागी झालेल्या दहा पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले होते आणि काही लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही याप्रकरणी सिंघल यांच्याकडून अहवाल मागवला आहे. सिंघल यांनी पुष्टी केली होती की वधू दाऊदच्या पत्नीची भाची होती ज्या लग्न समारंभात भाजपचे नेते आणि तत्कालीन फंडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

दाऊदची पत्नी आणि वधूची आई या दोघी बहिणी होत्या :
त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदची पत्नी आणि वधूची आई या दोघी बहिणी होत्या. मात्र माध्यमांनी वृत्त झळकावल्यावर महाजन यांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावल्याचे मान्य करताना वधूचे कुटुंब दाऊद इब्राहिमचे नातेवाईक असल्याची माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र सध्या हेच गिरीश महाजन आणि त्यांचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांचे माईक स्वतःच शोधत असतात आणि त्यावर वारंवार दाऊद-दाऊद, बॉम्बस्फोट-बॉम्बस्फोट असे शब्द ओरडत-ओरडत उच्चारून एक वातावरण निर्मिती करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत असल्याचं माध्यमांच्या देखील निदर्शनास पडत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis political strategy against MahaVikas Aghadi government ministers.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x