15 December 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Russia Ukraine War | जगातील या मोठ्या कंपन्या रशिया आणि युक्रेनमधील आपला व्यवसाय गुंडाळणार

Russia Ukraine War

मुंबई, 05 मार्च | कोणत्याही प्रकारच्या भांडणाचा परिणाम व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर दिसून येतो. रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतरही असाच परिणाम दिसून येत आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांना युक्रेन आणि रशियामधील त्यांच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करायची आहे. यामुळे काही कंपन्या रशिया आणि युक्रेनमधून आपला व्यवसाय बंद करण्याचा तयारीत आहेत. काही कंपन्या रशियातील त्यांच्या व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करत आहेत.

The effect of any kind of fight is seen on business and economy. some companies are withdrawing their business from Russia and Ukraine. Some companies are re-evaluating their business in Russia :

या कंपन्यांनी युक्रेनमधील कारखाने बंद केले :
ब्रेवर कार्ल्सबर्ग आणि जपान टोबॅको या कंपन्यांनी युक्रेनमधील त्यांचे कारखाने बंद केले आहेत. दुसरीकडे, UPS आणि FedEx Corp ने त्यांच्या सेवा देशात आणि देशाबाहेर सस्पेंड केल्या आहेत.

या कंपन्यांनी रशियाविरोधात ही पावले उचलली:
अॅपलने रशियामध्ये आपली उत्पादने विकणे बंद केले आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, रशियाच्या हल्ल्याबद्दल कंपनी अत्यंत चिंतेत आहे. कंपनीकडे रशियामधील Apple Pay सारख्या डिजिटल सेवांवर लिमिटेड ऍक्सेस आहे.

फेसबुकच्या मूळ कंपनीने सोमवारी रशियन न्यूज आउटलेट आरटी आणि स्पुतनिकचा प्रवेश ब्लॉक करण्याची घोषणा केली. संपूर्ण युरोपियन युनियनसाठी ही घोषणा करण्यात आली आहे.

ट्विटरने देखील रशियन माध्यमांच्या कन्टेन्टची विजिबलिटी और एम्पिलिफिकेशन कमी करण्याची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने या आठवड्यात असेही म्हटले आहे की ते देशातील रशियन टीव्ही चॅनेल प्रसारित करणार नाहीत.

Spotify ने देखील पावले उचलली :
Spotify ने रशियातील आपले कार्यालय बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “युक्रेनवर अप्रत्यक्षपणे झालेल्या हल्ल्यामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे.

गुगलच्या मालकीच्या YouTube ने सांगितले की त्यांनी आठवड्याच्या शेवटी युक्रेनमध्ये आरटीसह रशियन माध्यमांना ब्लॉक केले. व्हिडिओ प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की ते या चॅनेलसाठी शिफारसी मोठ्या प्रमाणावर मर्यादित करत आहेत.

Google आणि YouTube देखील म्हणाले की ते यापुढे रशियन माध्यमांना जाहिराती चालविण्यास आणि त्यांच्या कन्टेन्टमार्फत कमाई करण्यास परवानगी देणार नाहीत.

एअरबीएनबीचे सह-संस्थापक आणि सीईओ ब्रायन चेस्की यांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये सांगितले की कंपनी रशिया आणि बेलारूसमधील सर्व ऑपरेशन्स बंद करत आहे.

या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायाचे पुनरावलोकन देखील केले :
रशिया आणि युक्रेनमधील त्यांच्या व्यवसायाचे पुनरावलोकन करणार्‍या आणि संपुष्टात आणणार्‍या किंवा मर्यादित करणार्‍या कंपन्यांमध्ये Disney, Boing, BP, General Motors, Volkswagen, Master Card, Ikea, Diageo, Volvo, Daimler आणि Renault सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Russia Ukraine War big companies will exit business from Russia after war.

हॅशटॅग्स

#Russia Ukraine Crisis(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x