22 November 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

त्या व्हिडिओत प्रथम दर्शनी मोठी छेडछाड केली गेल्याची शक्यता | व्यक्ती हावभाव आणि ऑडिओत विरोधाभास

Devendra Fadnavis

मुंबई, ०८ मार्च | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडीओ क्लिप्स सुपूर्द करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय.

प्रथम दर्शनी व्हिडिओतील व्यक्तीचे हावभाव आणि ऑडिओत प्रचंड विरोधाभास :
यातील ज्या व्हिडिओ क्लिप्स प्रसार माध्यमांच्या समोर आल्या आहेत. मात्र हे व्हिडिओ स्ट्रिंग ऑपरेशन असण्यापेक्षा संबंधित वकिलांच्या कार्यालयातीलच CCTV फुटेज असल्याचं दिसतंय. हे व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास यातील व्यक्तीचा संवाद (ओठांचे हावभाव) आणि प्रत्यक्ष ऑडिओ यामध्ये मोठी तफावत आणि विरोधाभास असल्याचं स्पष्ट दिसतंय. सव्वाशे तासांचा व्हिडिओ म्हणजे तो त्याच कार्यालयातील CCTV फुटेजच असणार यात वाद नाही. कारण इतका सुस्पष्ट व्हिडिओ अँगल CCTV मध्येच सेट केलेला असतो जे स्ट्रिंग ऑपरेशनच्या कॅमेऱ्यात अशक्य असते. ते कार्यालयातील CCTV रेकॉर्डिंग असल्यास तो व्हिडिओ डेटा अधिक दिवस ठेवता येत नाही. मात्र सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सर्व्हरवरून मिळवता येऊ शकतो. तसं काही या प्रकरणात झालं आहे का ते तपासावं लागेल. तसेच यामध्ये कार्यालयातील एखादी व्यक्ती मॅनेज केल्याची दाट शक्यता आहे.

व्हिडिओत समोर आलेली राजकीय आणि अराजकीय नावं (विरोधक – सत्ताधारी आणि अधिकारी) भाजपाच्या सोयीप्रमाणे :
या व्हिडिओतील अस्पष्ट संवादात समोर आलेली विरोधक, सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची नावं अगदी भाजपाच्या सोयीप्रमाणे आली असून त्यात ‘साहेब’ हे सायलेंट ठेवण्यात आलं आहे हे विशेष.

CBI’च्या इंट्रीसाठीच योजना नाही ना?
या प्रकरणात घाई घाईने CBI इंट्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असेच संकेत मिळत आहेत. कारण हाच अस्पष्ट आणि विरोधाभास दाखवणारा व्हिडिओ त्यासाठी आधार बनवला जाऊ शकतो. कारण तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्ही न्यायालयामार्फत ते करू असे संकेतच फडणवीसांनी दिले आहेत. अनिल देशमुख प्रकरणात हाच गेम प्लान झाला होता. राज्य सरकार सीबीआयला मान्यता देणार हे माहित असल्याने फडणवीसांनी आधीच या प्रकरणात ती सोय केली आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात.

फडणवीस सभागृहात मुद्दा मांडून खाली बसले आणि काही सेकंदात व्हिडिओ माध्यमांकडे?
फडणवीसांनी संबंधित व्हिडिओचा पेन ड्राईव्ह सभागृह अध्यक्षांना प्रथम दिला आणि स्वतःकडे काही तुकड्या तुकड्यात क्लिप्स आहेत असे सांगत ते त्यांनी स्वतःच्या बाजूला ठेवले. जर फडणवीस सभागृहातच होते आणि सत्ताधाऱ्यांना त्या क्लिप्स बघायला मिळालेल्या नसताना आणि फडणवीसांची या मुद्द्यावरील चर्चा सभागृहात संपताच काही सेकंदात या क्लिप्स काही माध्यमांवर कशा झळकू लागल्या हा प्रश्न निर्माण होतोय आणि वेगळाच संशय व्यक्त होतोय.

छेडछाड केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याचा भाजपचा मोठा इतिहास :
या पूर्वी देशात असे अनेक व्हिडिओ मूळ व्हिडिओत छेडछाड करून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा भाजपचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे CCTV मधील व्हिडिओ घेऊन त्यात छेडछाड करणे आणि संभ्रम निर्माण करणारा ऑडिओ देणे हे आजच्या घडीला अत्यंत सोपं काम झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

व्हिडीओची सत्यता पडताळावी लागेल- वळसे पाटील
देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप करत एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला. आपल्याकडे तब्बल सव्वाशे तासाचं फुटेज असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. फडणवीसांच्या या आरोपांबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की अजून मी व्हिडीओ पाहिले नाहीत. उद्या मी यावर उत्तर देईन. व्हिडीओची सत्यता पडताळावी लागेल. जे आरोप झालेत त्यावर उद्या सविस्तर बोलेन, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis allegations through video.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x