22 November 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजप एमपी'त बाहेर, राजस्थानात सुपडा साफ तर तेलंगणात क्लीन बोल्ड होणार?

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. आता उत्सुकता आहे ती, ११ तारखेच्या निकालांची. आता विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल अंदाज येण्यास एकामागे एक सुरुवात झाली आहे. त्यानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची सत्ता भारतीय जनता पक्षाला गमवावी लागेल असं चित्र आहे. तसे झाल्यास भारतीय जनता पक्षासाठी आणि मुख्यत्वे मोदी आणि अमित शहांना तो मोठा धक्का असेल असं म्हटलं जात आहे.

कोणता एक्सिटपोल काय अंदाज देतो आहे?

ABP, लोकनीती, CSDSच्या सर्वेनुसार मध्यप्रदेशात राष्ट्रीय काँग्रेसला अंदाजे १२६ जागा मिळतील तर भारतीय जनता पक्षाला ९४च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळे यासर्वेत काँग्रेसची बहुमताने सत्ता येणार असा अंदाज आहे.

इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेशात अंदाजे १०२ ते १२० च्या आसपास जागा मिळतील तर दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेसला १०४ ते १२२ च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हा सर्वे दोन्ही प्रमुख पक्षांना समसमान संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

India Today, EXIS आणि My India ने केलेल्या सर्वेनुसार राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ ५५ ते ७२ जागांवर समाधान मानावे लागेल. तर राष्ट्रीय काँग्रेसला अंदाजे ११९ ते १४१ जागा मिळतील. राजस्थानमध्ये एकूण २०० जागांसाठी मतदान झाले आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

News Nation ने दिलेल्या एक्सिट पोलनुसार राजस्थानात राष्ट्रीय काँग्रेसला एकूण ११० ते १२० जागा मिळतील तर भारतीय जनता पक्षाला एकूण ७० ते ८० जागांवर समाधान मानावे लागेल.

सी-वोटरच्या सर्वेनुसार राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला ५२ ते ६८ जागा मिळतील आणि राष्ट्रीय काँग्रेसला एकूण ८१ ते १०१ जागा मिळतील असा अंदाज आहे.

Times Now CNX ने केलेल्या सर्वेनुसार राजस्थानात काँग्रेसला १०५ तर भारतीय जनता पक्षाला ८५ जागा मिळतील असा अंदाज आहे.

India Today सर्वेनुसार तेलंगणमध्ये TRS ला एकूण ७९ ते ९१ जागा, राष्ट्रीय काँग्रेसला २१ ते ३३ जागा आणि भारतीय जनता पक्षाला केवळ १ ते ३ जागा मिळतील असा अंदाज आहे.

India Today EXIS MY India ने केलेल्या सर्वेनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला २१ ते ३१ जागा तर राष्ट्रीय काँग्रेसला ५५ ते ६५ जागा मिळतील असा अंदाज.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x