23 November 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

भाजपला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवादी आणि मुंबई बॉम्बस्फोट कनेक्शन | फडणवीस मूग गिळून गप्प | संपूर्ण पोलखोल

Devendra Fadnavis

मुंबई, 09 मार्च | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आज मुंबईत मोर्चा काढणार आहे. आझाद मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालीय. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानावर दाखल झाले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असून राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे, मात्र आता एक प्रकरण उलटं भाजप आणि फडणवीसांवर शेकू शकते. कारण प्रकरण थेट भाजप, दाऊद आणि टेरर फंडिंग संबंधित आहे.

भाजप, दाऊद आणि टेरर फंडिंग…. नेमकं गंभीर प्रकरण काय?
आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा जानेवारी २०२० मध्ये उपस्थित केला होता. कारण ठरलं होतं, संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत येत होत्या, याचसोबत मंत्रालयात अंडरवर्ल्डचे गुंड येत जात असायचे, असं देखील संजय राऊत म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फैलावर घेत काही गंभीर सवाल उपस्थित केले होते. तसेच काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? काँग्रेसने संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील फडणवीस म्हणाले होते.

भाजपाला पार्टी फंड आणि त्या कंपनीचे दाऊद आणि टेरर कनेक्शन उघड :
भाजपला मिळणाऱ्या पक्षनिधी बद्दल अधिकृत माहिती यापूर्वीच बाहेर आली आहे ज्याबद्दल फडणवीस अंधारात असावे. वास्तविक आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सकडून भारतीय जनता पक्षाला मोठी रक्कम दान म्हणजे पार्टी फंड म्हणून मिळाली होती. धक्कादायक म्हणजे इक्बाल मिर्ची या अंडरवल्ड’मधील कुप्रसिद्ध व्यक्तीबरोबर व्यावसायिक संबंध असल्याच्या संशयावरून हीच कंपनी ईडी’च्या चौकशी फेऱ्यात असल्याचं वृत्त ‘द-वायर’ने प्रसिद्ध केलं होतं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबध असणारा इक्बाल मिर्ची उर्फ ​​इक्बाल मेमन हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.

‘द वायर’च्या वृत्तानुसार, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडने २०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला १० कोटी रुपयांचा पार्टी फंड अर्थात पक्षनिधी दिल्याचं देखील म्हटलं आहे. विशेष म्हणजे स्वतः भारतीय जनता पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये ही बाब समोर आली होती. तसेच त्याच कार्यकाळात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आर्थिक मदत (पार्टी फंड) याच विवादित RKW बिल्डर्स’ने दिली आहे. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरीची कारवाई सुरु केलेल्या DHFL या कंपनीसोबत देखील RKW बिल्डर्स’चे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं होते.

ईडीकडे पुरावे पण भाजपवर कारवाई नाही :
ईडीने RKW बिल्डर्स’चे माजी संचालक रणजीत बिंद्रा यांना इक्बाल मिर्ची आणि इतर कंपन्यांदरम्यान व्यवहारांदरम्यान मध्यस्ती केल्याच्या आरोपावरून अटक देखील केलं आहे. त्यानंतर ‘सनब्लिंक रिअल इस्टेट’ नावाच्या कंपनीने देखील भारतीय जनता पक्षाला २ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे ‘द-वायर’ने म्हटले होतं. विशेष म्हणजे या कंपनीवर देखील इक्बाल मिर्ची’कडून प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आहे.

Donation

त्यानंतर स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी ज्याचे संचालक मेहुल अनिल बाविशी यांचे सनब्लिंकशीही घनिष्ट संबंध असल्याचं समोर आलं होतं. याच स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड भाजपाला २ कोटी पार्टी फंड दिल्याचं निवडणूक आयोगाला दिल्या गेलेल्या माहितीत म्हटलं होतं. त्यानंतर दर्शन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने भाजपाला २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ७ कोटी ५० लक्ष पार्टी फंड दिल्याचं म्हटलं होतं आणि याच कंपनीचे संचालक प्लॅसिड जेकब नॉरोन्हा यांचे RKW बिल्डर्स’सोबत घनिष्ट संबंध असल्याचं म्हटलं होतं.

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी ईडीने इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी सर्व आरोप फेटाळले होते आणि आपण कोणताही गैरव्यवहार केलं नसल्याचं म्हटलं होतं. तसेच याच प्रकरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उल्लेख देखील केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यामागे ससेमिरा लागल्याचं म्हटलं जाऊ लागलं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंडरवर्ल्ड’मधील लोकांसोबत व्यवसाय करणे हे देशद्रोहापेक्षा कमी नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजवाला यांनी ट्विटरवर भाजपाला चांगलेच कात्रीत पकडलं होतं.

याच विषयावरून महाविकास आघाडी भाजप आणि फडणवीसांविरोधात मोर्चा काढणार ?
याच भाजप, दाऊद आणि टेरर फंडिंग विषयावरून उद्या महाविकास आघाडी भाजप आणि फडणवीसांविरोधात विराट मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरल्यास फडणवीस भलतेच अडचणीत येतील यात शंका नाही. आणि संपूर्ण विषय भाजपवरच पलटेल असा हा गंभीर निहाय आहे.

भाजपला टेरर फंडिंग करणाऱ्या कंपनीने डोनेशन दिल्याचं फॅक्ट चेक पुरावा पाहायचा असल्यास पुढील लिंक वर वाचा : https://bit.ly/3hTQ9ua

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP receive Crores in donation from a Co accused of buying properties of Iqbal Mirchi a Dawood Ibrahim aid.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x