5 November 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

निवडणूक निकालाची हवा? | त्यांना काही डोकं आहे का! | सोडणार नाही यांना आम्ही | गिरीश महाजनांची पवारांना थेट धमकी?

BJP Leader Girish Mahajan

मुंबई, 10 मार्च | एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. मुंबईत ते काल पत्रकारांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे.

अशा एजन्सी फक्त भारत सरकारकडे – शरद पवार
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओविषयी बोलताना शरद पवार म्हणाले होते, ‘ ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे.

125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग काम करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यात जाऊन राज्यात जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास जे काही काम केलं टेप केलं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले ते खरं आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे असं शरद पवार म्हणाले होते.

आज निकालाचे कल येताच भाजप नेत्यांच्या थेट शरद पवारांना धमक्या :
आज सकाळपासून पाच राज्यांमधील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपने मोठी आघाडी घेतली असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. मात्र काही क्षणातच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या डोक्यात त्याची हवा गेल्याच पाहायला मिळतंय. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आज या निकालावर आपलं मत व्यक्त केले, यावेळी माध्यमांनी त्यांना शरद पवारांनी 125 तास रेकॉर्डिंग संबंधित दिलेल्या प्रतिक्रियेवर विचारताच त्यांनी ‘त्यांना काही डोकं आहे का? त्यात रेकॉर्डिंग वर्षभराचं देखील मिळतं आणि आम्ही यांना सोडणार नाही अशी थेट धमकी देऊन टाकल्याने भविष्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद पेटण्याची शक्यता आहे.

रेक्रॉडींग बद्दल :
महाराष्ट्रनामाने यापूर्वीच म्हटले होते की ते संपूर्ण रेकॉर्डिंग कार्यालयातील CCTV कॅमेरा मधील असावे असे दिसत होते. त्याचा स्ट्रिंग ऑपरेशनशी कोणताही संबंध नसावा. तसेच कार्यालयातील व्यक्तीकडून आणि CCTV सर्व्हिस प्रोव्हायडरला हाताशी धरून हा जुना व्हिडिओ डेटा मुख्य स्टोरेज सर्व्हरवरून मिळवला असावा. आणि तसेच स्पष्ट संकेत गिरीश महाजन यांच्या आजच्या वक्तव्यातून जवळपास मिळाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Leader Girish Mahajan reply over Sharad Pawar statement on video recording.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x