22 November 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Inflation | प्रचंड महागाईमुळे सामान्य लोकांची जगण्यासाठी धडपड | IMF चा मोदी सरकारला लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला

Inflation Effect

मुंबई, 11 मार्च | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मोलाचा सल्ला दिला आहे . आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या MD क्रिस्टिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे की महामारीच्या काळातही मोदी सरकारचे व्यवस्थापन चांगले होते, परंतु जागतिक बाजारपेठेत ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि महागाई भारतीयांसाठी संकट (Inflation) निर्माण करू शकतात.

IMF MD Georgieva said that, it is most important to save those people of the country, who are struggling to fill their stomach and run their families :

आयएमएफच्या एमडी म्हणाल्या, कोविड-19 महामारीच्या प्रभावातून सावरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जलद पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहे. ऊर्जेची वाढती किंमत भारताच्या मार्गात अडथळे आणू शकते. ही एकमेव गोष्ट आहे जी भारतीय अर्थव्यवस्थेला आपले लक्ष्य पूर्ण करण्यापासून रोखू शकते. सध्याच्या सरकारला जागतिक बाजाराच्या या संकटातून मार्ग काढावा लागणार आहे.

महागाईमुळे लोकांच्या खिशावर बोजा वाढणार आहे :
IMF च्या फर्स्ट डेप्युटी एमडी गीता गोपीनाथ यांनी देखील ऊर्जा संकटाला भारतासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत त्या म्हणालय की, भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. भारताला आवश्यक असलेली बहुतांश ऊर्जा आयात केली जात असल्याने, जागतिक बाजारपेठेतील वाढत्या किमतींमुळे त्यावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. किरकोळ महागाई आधीच ६ टक्क्यांच्या वर आहे आणि ती आणखी वाढल्यास लोकांच्या खिशावरचा बोजा वाढेल.

प्रथम गरजूंवर लक्ष केंद्रित करा :
जॉर्जिव्हा म्हणाले की, आमचा भारताला सल्ला आहे की, सर्वप्रथम अशा विभागांकडे लक्ष दिले पाहिजे ज्यांची सर्वाधिक गरज आहे. सध्या केवळ ऊर्जेच्या किमतीच वाढत नाहीत तर खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढत आहेत. अशा स्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी धडपडणाऱ्या देशातील लोकांना वाचवणे सर्वात महत्त्वाचे आहे.

आर्थिक धोरणेही बदलावी लागतील :
IMF प्रमुख म्हणाले की, भारतालाही आपल्या आर्थिक धोरणांमध्ये गरजेनुसार बदल करावे लागतील. मोदी सरकार इच्छित असल्यास, ते आपल्या वित्तीय तूट लक्ष्यात सुधारणा करू शकते, परंतु समाजातील गरजू वर्गासाठी आपली तिजोरी उघडावी लागेल. आगामी काळात सरकार या संकटाला कसे सामोरे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IMF MD Georgieva advice to Modi government over inflations issue in India.

हॅशटॅग्स

#Inflation(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x