19 April 2025 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

RBI गव्हर्नर उर्जित पटेलांचा राजीनामा हीच मोदी सरकारची उलटी गिनती सुरु : राज ठाकरे

नवी दिल्ली : सध्या केंद्रातील मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे. RBI गव्हर्नर उर्जित पटेलांचा राजीनामा यांचा राजीनामाहाच संदेश देऊन जातो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे.

दरम्यान, नुकतीच लंडन येथे वास्तव्यास असलेल्या विजय मल्ल्या याच्या भारतातील प्रत्यार्पणाची बातमी आली आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘विजय मल्ल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता मग त्याच्यावर पळून जाण्याची वेळ का आली? तसेच पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी नीरव मोदीबाबत मोदी सरकार मिठाची गुळणी का धरून आहे ? असा प्रश्न सुद्धा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला.

RBI गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा केंद्र सरकारच्या दबावामुळे कधीही राजीनामा देतील अशी शक्यता अनेक दिवसांपासून रंगली होती. १९ नोव्हेंबरला केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि RBI झालेल्या बैठकीनंतर सर्वकाही सुरळीत झाले असल्याचे वृत्त पसरले होते. परंतु, आज अचानक उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या