27 April 2025 5:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN
x

आर.एस.एस ची कामगार संघटना 'भारतीय मजदूर संघ' मोदींवर नाराज.

नवी दिल्ली : सामान्य मध्यमवर्गीय नागरिकच नाही तर आता आर.एस.एस ची कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ सुध्दा अर्थसंकल्पावर नाराज असल्याचे समजते. केवळ नाराजीच नाही तर त्याविरोधात देशभर जोरदार निदर्शनं ही होणार आहेत.

भारतीय मजदूर संघाने केलेल्या आरोपानुसार या अर्थसंकल्पात अंगणवाडी आणि कामगारांच्या मागण्यांकडे संपूर्ण कानाडोळा करण्यात आला आहे. त्या विरोधाचाच भाग म्हणून आता भारतीय मजदूर संघ देशभर जोरदार निदर्शनं करणार असल्याचे भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस व्रिजेश उपाध्याय यांनी प्रसार माध्यमांना पत्रकाद्वारे कळवले आहे.

भारतीय मजदूर संघाच्या म्हणण्यानुसार आधीच नोटबंदी आणि जीएसटी मुळे लघु आणि मध्यम उदयोगांचे प्रचंड नुकसान होऊन अनेक जण बेरोजगार ही झाले आहेत. त्यात कालच्या अर्थसंकल्पात कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुले, भारतीय मजदूर संघाने मोदी सरकारच्या धोरणांवरून मोठी टीकेची झोड उठविण्याचे ठरले आहे.

आधी शिवसेना, टीडीपी आणि आता भारतीय मजदूर संघ असे एक ना अनेक भाजपशी संबंधित पक्ष आणि संघटना मोदी सरकार विरोधात रान उठवत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या