24 April 2025 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

लोकांच्या समस्या महागाई, बेरोजगारीत | आणि भाजप नेते म्हणतात फडणवीसांच्या चौकशीमुळे जनतेचा उद्रेक होईल

Devendra Fadnavis

मुंबई, 13 मार्च | राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. चौकशीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, फडणवीसांना देण्यात आलेली नोटीस आणि चौकशीचा भाजपकडून निषेध केला जात आहे. सागर बंगल्याबाहेर भाजप आमदारांसह कार्यकर्तेही जमा झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. पैसे घेऊन पोलिसांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे बदल्या केल्या गेल्या, असा आरोप फडणवीसांनी केलेला आहे. याच प्रकरणात फडणवीसांविरुद्ध मुंबईतील सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात फडणवीसांना नोटीस बजावली होती. मात्र, अचानक चौकशीच्या ठिकाणात बदल करण्यात आला. पोलीस फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यातच चौकशी केली जात आहे. त्यामुळे बंगल्याबाहेर मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सहपोलीस आयुक्त नितीन जाधव हे दोन पोलीस कॉन्स्टेबलसह फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच अधिकारी दाखल झाले असून, आता चौकशी सुरू झाली आहे.

सागर बंगल्याबाहेर भाजप नेत्यांच्या धमक्या आणि हास्यास्पद प्रतिक्रिया :
देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर चौकशी सुरु झाल्यापासून तेथे हजर असलेले भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर वारंवार वेगवेगळ्या वाहिन्यांवर धमक्या आणि इशारे देत आहेत. त्यात जर चौकशी अधिक वेळ सुरु राहिल्यास राज्यात उद्रेक होईल आणि जनता फडणवीसांसाठी रस्त्यावर उतरेल अशा हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविक सामान्य जनतेचे मुख्य प्रश्न प्रचंड वाढलेली महागाई आणि बेरोजगारीत आहेत. त्यात आज रविवार म्हणजे रोजच्या काम आणि दगदगीतून आराम किंवा कुटुंबासाठी वेळ देणं हाच सामान्य माणसाचा दिनक्रम असतो. राजकारण्यांच्या वायफळ चर्चा आणि इशारे ऐकत बसण्यात त्यांना कोणताही रस नसतो. मात्र मोदी सरकारच्या काळात महागाई आणि बेरोजगारीत होरपळलेली जनता भाजप नेत्यांसाठी रस्त्यावर उतरेल हा भाजप नेत्यांचा केवळ विनोद समजावा लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis inquiry by Mumbai Police at Sagar Bungalow in police transfer case.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या