22 November 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON
x

चाणक्यांनी छत्तीसगड'मधील पराभवाची जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलली

रायपूर : आजच्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे. आजचा निकाल मान्य करताना माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांनी काँग्रेसला सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु विजय झाल्यावर आतुरतेने पत्रकार परिषदा घेणारे अमित शहा यांनी सर्व जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलण्याचे बोलले जात आहे.

एकूणच देशभरातून काँग्रेसवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे मोदी आणि अमित शहा यांच्यावर प्रचंड टीका होताना दिसत आहे. परंतु, पराभव हाती येताच भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जवाबदारी झटकण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास येते आहे. जर येथे भाजपने विजय संपादित केला असता तर स्वतःला राजकारणातील चाणक्य समजणारे अमित शहा हे मोदींच्या लोकप्रियतेमुळे आणि मोदी करिष्म्यामुळे शक्य झाल्याचे म्हणाले असते.

परंतु पराभव पदरात पडताच सर्व जवाबदाऱ्या स्थानिक नेत्यांवर टाकून अमित शहा आणि मोदींनी हात झटकण्यास सुरुवात केल्याची कुजबुज सुरु झाली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x