4 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
x

मातोश्री-२ हे शिवसेना पक्षप्रमुखांचं नवं ८ मजली निवासस्थान लवकरच पूर्ण होणार?

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लवकरच त्यांच्या ८ मजली नव्या मातोश्री २ या निवासस्थानी वास्तव्यास जाण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरेंना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे NOC हस्तांतरीत केलं आहे. तर १२ ऑक्टोबरला हे भोगवटा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं आहे. तसेच अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा २८ सप्टेंबरलाच देण्यात आलं आहे.

त्याआधी २०१६ मध्येच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी या इमारतीचा प्लॉट ११.६० कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यावर ५८ लाख रूपये एवढी स्टॅम्प ड्युटी सुद्धा त्यांनी सरकारला अदा केली होती. यापूर्वी सदर प्लॉट कट्टीनगेरी कृष्णा हेब्बर यांच्या मालकीचा होता. तो उद्धव ठाकरे यांनी २०१६ मध्ये विकत घेतला होता. २०१९ च्या शेवटी उद्धव ठाकरे कुटुंबीय मातोश्री-२ मध्ये वास्तव्यास जाण्याची शक्यता आहे.

‘मातोश्री -२’च्या ६ मजल्यांसाठी सीसी मुंबई महापालिकेनं दिलेलं आहे. उर्वरित २ मजल्यांसाठी परळ येथील एका SRA प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला. परंतु त्या व्यवहारावर मुंबई महापालिकेनं आक्षेप घेतला होता. त्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांनी ते प्रकरण थेट फडणवीसांकडे वर्ग केलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी या इमारतीला विशेष परवानगी दिली होती.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x