25 November 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

नगर निवडणूकः भाजपा-एनसीपी'ची खेळी, शिवसेनेला धोबीपछाड, महापौर भाजपचा

नगर : सकाळी अकरा वाजता महापौर निवडीची सभा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यास सुरुवात झाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर सपा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला एकूण ०८ मते मिळाली तर एनसीपीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बारस्कर, अविनाश घुले, नज्जू पहिलावान हे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबतच महापालिकेत हजर झाले.

त्याचवेळी एनसीपी आणि भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. दरम्यान, सभागृहात महापौर पदासाठी एनसीपी’कडून उमेदवारी दाखल केलेल्या नगरसेवक संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे असे २ उमेदवार अखेर रिंगणात उरले होते.

वाकळे यांना एकूण ३७ मतं मिळाली. त्यात भाजपचे १४, एनसीपीची १८, बसपा ०४ तर अपक्ष ०१ अशा मतांचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बोराटे यांना एकूण ०८ इतकी मते मिळाली. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x