25 November 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News
x

सेनेच्या नगरसेवकांनी शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमचा पाठिंबा मागितला, ऐकवली ऑडिओ क्लिप

अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनीच माझ्याकडून पाठिंबा मागितला, त्यामुळे त्यांच्याच विनंती आणि मागणीनुसार मी शिवसेनेला मतदान केलं असं स्पष्टीकरण शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने प्रसार माध्यमांशी संबंधित विषयावरून संवाद साधताना दिलं आहे.

दरम्यान, महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यानंतर सभागृहात छिंदम याला मारहाण झाल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. छिंदम हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे तो कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार त्याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी तिथे धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना छिंदम म्हणाला, बाळासाहेब बोराटे यांनी मला मतदान करण्याची विनंती केली. इतकंच नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मतदान करण्यास सांगितले. त्या सर्वांचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिग आहे. दरम्यान, सभागृहात मतदानावेळी मी बोराटे यांना मतदान करत असताना मला रोखण्यात आले. माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यावेळी केला. परंतु, हात उचलणारे नगरसेवक पळकुटे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे छिंदम याने सांगितले. शिवसेनेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x