16 April 2025 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

KGF Chapter 2 | केजीएफ चॅप्टर 2 ने ओलांडला 1000 कोटींचा आकडा | चित्रपटाने रचला हा नवा विक्रम

KGF Chapter 2

KGF Chapter 2 | दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने १००० कोटींचा आकडा पार केला आहे. जबरदस्त अॅक्शन आणि इमोशन्सनी भरलेल्या या सिनेमाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि चाहते बराच वेळ या सिनेमाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक यशस्वी झाला असून या चित्रपटाने पॅन इंडियामध्ये जबरदस्त व्यवसाय केला आहे. चित्रपटाचा व्यवसाय अप्रतिम असून हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात हाऊसफुल होतो आहे.

The box office collection of South’s superstar actor Yash’s film ‘KGF Chapter 2’ has crossed the Rs 1000 crore mark :

केजीएफ 2 हा देशातील चौथा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे :
बाहुबली-२, दंगल आणि आरआरआरनंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत केजीएफ-२ हा चौथा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात, जिथे बहुतेक स्टार्स साऊथचे होते, तिथे संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज आणि श्रीनिधी शेट्टी यांसारखे बॉलिवूड स्टार्सही दुसऱ्या भागात झळकले आहेत. शनिवारी चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर करताना रमेश बाला यांनी ट्विटरवर लिहिले की, “केजीएफ चॅप्टर 2 ने वर्ल्ड वाइड कलेक्शनच्या बाबतीत 1000 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘

यशच्या चित्रपटाचा या यादीत समावेश :
रमेश बाला यांनी लिहिले की, “दंगल, बाहुबली 2 आणि आरआरआरनंतर 1000 कोटींचा आकडा पार करणारा हा चौथा भारतीय चित्रपट आहे. केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा 134.50 कोटींचा व्यवसाय होता. हा चित्रपट केजीएफ चॅप्टर १ चा सिक्वेल असून यात त्याने पुन्हा एकदा रॉकीची भूमिका साकारली आहे.

केजीएफ २ ची १५०० कोटी रुपयांच्या दिशेने वाटचाल :
संजय दत्तने या चित्रपटात अधीराची भूमिका साकारली असून आता हा चित्रपट १५०० कोटींचा आकडा पार करू शकेल की नाही हे पाहावं लागेल. एकीकडे यशचा केजीएफ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर भरपूर व्यवसाय करत असताना दुसरीकडे यशने पानमसालाच्या जाहिरातीसाठी कोट्यवधींचा सौदा नाकारल्याची माहिती आहे. यशने अशी जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: KGF Chapter 2 Movie has crossed the Rs 1000 crore mark on box office collection 30 April 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)#KGF Chapter 2(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या