22 November 2024 7:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Inflation Effect | पैसा खर्च करत राहा फक्त | साबण, शॅम्पूसह अनेक उत्पादने 15 टक्क्यांपर्यंत महाग

Inflation effect

Inflation Effect | चलनवाढीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक दरांत वाढ केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ग्राहकोपयोगी उत्पादने उत्पादक कंपन्यांनी गुरुवारपासून भाववाढ करण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरने (एचयूएल) साबण, शॅम्पूसह अनेक उत्पादनांच्या किमतीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

Hindustan Unilever (HUL) has increased the prices of many products including soaps and shampoos by up to 15 percent :

सौंदर्यप्रसाधनांच्या किंमतीतही 10 टक्के वाढ :
रिपोर्टनुसार, 125 ग्रॅम पिसरी साबणाच्या किंमतीत 2.4 टक्के आणि मल्टीपॅकच्या किंमतीत 3.7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. लक्स साबणाच्या किंमतीत नऊ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर सनसिल्क शॅम्पूच्या किंमतीतही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्लिनिक प्लस शॅम्पूच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय इतर सौंदर्यप्रसाधनांच्या किंमतीतही 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.

एफएमसीजी कंपन्यांनी किमतीत वाढ केली :
मुख्य म्हणजे अवघ्या दोन महिन्यांतच एफएमसीजी कंपन्यांनी किमतीत वाढ केली आहे. याआधी एचयूएल आणि नेस्लेने मॅगी, चहा आणि कॉफीच्या दरात यंदा 14 मार्चपासून वाढ केली होती. अलीकडेच एचयूएलचे सीईओ आणि एमडी संजीव मेहता यांनी सांगितले होते की, त्यांनी कंपनीत घालवलेल्या 30 वर्षांत इतकी भाववाढ झालेली नाही.

ब्रिटानियानेही किमतीत 10 टक्के वाढ जाहीर केली :
दुसरीकडे ब्रिटानियानेही यंदा उत्पादनांच्या किमतीत 10 टक्के वाढ जाहीर केली आहे. याआधी कंपनीने यात सात टक्क्यांनी वाढ होईल, असे सांगितले होते, मात्र कच्च्या मालाच्या किमतीत झालेली मोठी वाढ लक्षात घेता कंपनी चालू आर्थिक वर्षात आधीच्या अंदाजापेक्षा जास्त भाव वाढविणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वरुण वेरी यांनी सांगितले.

ग्राहकांना खर्च कमी करणे भाग पडणार :
किंमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे ग्राहकांना दररोजच्या उत्पादनांवरील खर्चात कपात करावी लागणार आहे. कंतर यांच्या अहवालानुसार जानेवारी-मार्च या तिमाहीत एफएमसीजी उत्पादनांवरील एकूण खर्चात ०.८ टक्क्यांची घट झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील वाढीपेक्षा एकूण घट कमी झाली आहे. ग्रामीण क्षेत्रात यावरील खर्चात १.७ टक्के, तर शहरी भागात ३.४ टक्क्यांनी घट झाली आहे. एफएमसीजी उत्पादनांच्या एकूण विक्रीत शहरी भागाचा वाटा दोन तृतीयांश आहे. आगामी काळात या उत्पादनांवरील खर्चात आणखी घट दिसून येऊ शकते, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Inflation effect many FMCG products prices increased up to 15 percent check details here 06 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x