18 April 2025 8:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

मोदींची मुलाखत: बरोबर मोदीजी! प्रियांका चतुर्वेदींनी मोदींना 'त्या' शब्दांची आठवण करून दिली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून लोकसभा निवडणूकपूर्व ठरवून घेतलेली मुलाखत अशी विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. या मुलाखतीदरम्यान मोदींनी काँग्रेसच्या विधानांवर भाष्य केलं आणि म्हणाले की, जैसी जिसकी सोच, वैसे शब्द’ असं उत्तर दिल. सदर मुलाखत जवळपास ९५ मिनिटांची होती.

मोदींच्या मुलाखतीतील या उत्तरावर काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी मोदींना त्यांच्या शब्दांची आठवण करून दिली आहे आणि त्यातून त्यांचे विचार काय आहेत ते लोकांना समजलं आहे, असा संदेश दिला आहे.

प्रियांका चतुर्वेदींनी ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे की, ‘ज्याचे जसे विचार तसे त्याचे शब्द’ असं पंतप्रधान मुलाखतीत म्हणाले. खरं आहे! आणि तुम्ही तुमच्या विचारातील शब्दांचा दर्जा दाखवला आहे, जसं ‘खुनी पंजा’ ‘जर्सी गाय’ ‘काँग्रेस की विधवा’ ‘नाईट वॉचमन’ ‘५० करोड की गर्लफ्रेंड’.

मोदींना त्यांच्याच विचारातून आलेल्या शब्दांची आठवण प्रियांका चतुर्वेदी यांनी करून दिली आहे आणि मोदींना चांगलीच चपराक लगावली आहे, असंच म्हणावं लागेल या ट्विट वरून.

काय नेमकं ट्विट आहे ते प्रियांका चतुर्वेदी?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony