22 November 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज ठाकरेंचा अपवाद वगळता, एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही: मांजरेकर

मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर अर्थात समोर नाव येते ते पुलंचेच. होय! पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या नावाची काय जादू आहे हे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक आज सुद्धा जाणतो. लवकरच म्हणजे अगदी शुक्रवारी त्यांच्या आयुष्यावर ‘भाई’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. परंतु, दुर्दैव हे की अशा महान व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित सिनेमासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्वाच्या थिएटर्समध्ये स्क्रीन आणि प्राइमटाइमच उपलब्ध नाही.

वास्तविक महाराष्ट्राच्या एका लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक कलाकृती सादर होत असताना त्याचे उत्तम पणे स्वागत व्हायला हवे. विशेष म्हणजे विद्येच्या माहेरघरात अर्थात पुण्यात तर पुलंचं दीर्घकाळ वास्तव्य सुद्धा होतं. परंतु, तिथे सुद्धा त्यांच्यावरच्या चित्रपटाला स्क्रीन्स मिळू नये, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी निराश होऊन म्हणावं लागत आहे की, “होय मला लाज वाटते आहे मला, मी मराठी असल्याची!” एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातले पात्र, “लाज वाटते मला मी मराठी असल्याची” असा संवाद म्हणत असतं. परंतु, खेदाने आज तेच वाक्य म्हणण्याची वेळ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर ओढवली आहे. हा केवळ पुलंवरच्या चित्रपटाचा प्रश्न नाही तर समस्त मराठी सिनेमांमध्ये निरनिराळे विषय मांडले जात असताना सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही. धक्कादायक म्हणजे त्याविरोधात कोणी साधा आवाज सुद्धा उठवत नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक अपवाद वगळला तर एका सुद्धा मराठी नेत्याला मराठी चित्रपटाबाबत कळकळ नाही. कारण, तसे असते तर हे असे घडलेच नसते असे सुद्धा महेश मांजरेकरांनी मुलाखतीदरम्यान मत व्यक्त केले.

मागील आठवड्यात सिंबा हा हिंदी सिनेमा प्रदर्शित होऊन सुद्धा या सिनेमाचे मल्टिप्लेक्समध्ये एका आठवड्यानंतर सुद्धा अनेक शो सुरु आहेत. तब्बल १५० ते ३०० शो रोज मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये पार पडत आहेत. अशी स्थिती असताना त्यात ‘भाई’ या मराठी सिनेमाला मात्र केवळ ४० ते ५० शो देण्यात आले आहेत. ‘सिम्बा’च्या वितरकांचा मोठा दबाव चित्रपटगृहांच्या मालकांवर येत आहे. त्यामुळे अनेका चित्रपटांनी ‘भाई’ चित्रपट दाखवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

वितरकांच्या प्रचंड दबावामुळे इच्छा असताना सुद्धा सिनेमा दाखविणे शक्य नाही, अशा दुहेरी कोडींत मालक सापडल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. दरम्यान, मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ला रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुले मुंबई- पुण्यासारख्या सिनेमागृहातून ‘सिम्बा’नं प्रचंड मोठी कमाई केली आहे. आता एका आठवड्यानंतर आणि मोठी कमाई केल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच सिनेमाला जाणीवपूर्वक महत्त्व दिले जाते आहे. त्यात खेदाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे वगळता, राज्यातील एकाही मराठी नेत्याला याबाबत आवाज उठवावासा वाटत नाही, अशीही खंत दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी त्यांच्या मुलाखतीत खेदाने बोलून दाखवली.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x