23 November 2024 4:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

इसारलय? | फिल्मी राजकीय अभिनयाच्या घाईत त्या हनुमान मूर्ती आणि भगव्या शालीवरील 'प्राईस टॅग' काढायला विसरल्या

Navneet Rana

Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काल दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि महाराष्ट्राचे आमदार रवी राणाही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी आरती केली आहे.

त्यानंतर राणा दाम्पत्याने यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राणा दाम्पत्य कोणाच्याही रिमोट कंट्रोलने चालणाऱ्यांपैकी नाही. भारतीय जनता पक्षाच्या ही नाही. ते पुढे म्हणाले की, आज आपण महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून मुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करत आहोत. मी तुरुंगात असताना दररोज 101 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायची. कोणत्याही निर्दोषाने तुरुंगात जावे असे मला वाटत नाही.

नवनीत राणा फिल्मी राजकीय स्टंट करत असल्याची समाज माध्यमांवर टीका :
दरम्यान, अमरावतीतील शिवसेनेच्या माजी खासदारांनी नवनीत राणा यांची खासदारकी खोट्या जातीच्या दाखल्यावरून संकटात आणली आहे. विशेष म्हणजे याच याचिकेवरून उच्च न्यायालयात त्यांना जोरदार धक्का मिळाला होता. त्यात अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर निवडून येणाऱ्या नवनीत राणा या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जवळीकमुळे अमरावतीत राजकीय दृष्ट्या संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेवर दबाव बनविण्यासाठी त्या सर्व स्टंट करत असल्याची जोरदार टीका समाज माध्यमांवर होऊ लागली आहे.

शिवसेनेकडून टीका :
विशेष म्हणजे काल दिल्लीत हमुमान चालिसाच्या नावाखाली त्यांची राजकीय स्टंटबाजी पुन्हा समाज माध्यमांच्या रडारवर आली आहे. काल त्यांनी एक नवीकोरी भगवान हनुमान यांची मूर्ती आणि भगवी शाल परिधान करून फोटोसेशन केले. मात्र राजकीय हेतूने फिल्मी फोटो काढण्यापूर्वी त्या भगवान हनुमान यांच्या मूर्तीवरील आणि भगव्या शालीवरील ‘प्राईस टॅग’ काढायला विसरल्या. त्यावरूनही समाज माध्यमांवर जोरदार टीका सुरु झाली आहे. शिवसेनेच्या प्रवक्ता आणि पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख प्रा.शिल्पा बोडखे यांनी देखील याच विषयाला अनुसरून नवनीत राणा यांना लक्ष केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Navneet Rana political stunt on Hanuman Chalisa check details here 15 May 2022.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x