16 April 2025 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

मुंबई महापालिका निवडणूक | राजकीय भूक वाढलेल्या भाजप नेत्यांनी रचलेला सापळा राज ठाकरेंनी वेळीच ओळखला?

Raj Thackeray

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पुण्यातील सभेत अयोध्या दौऱ्याबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या सभेआधीच अयोध्या दौरा तूर्तास स्थगित अशी पोस्ट राज ठाकरेंनी ट्विटरवर टाकली होती. त्यात त्यांनी असंही म्हटलं होतं की, पुण्यात या सविस्तर बोलू. त्यामुळे राज ठाकरे याबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. अखेर आपण दौरा फक्त मनसे कार्यकर्त्यांच्या काळजीपोटी हा दौरा रद्द केला असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आज राज ठाकरेंनी सभेला संबोधित करताना असा दावा केला की, ‘आपल्या सगळ्यांना अडकविण्यासाठी हा सगळा सापळा रचला गेला होता. म्हणून मी दौरा रद्द केला. मी जात नाही म्हटल्यावर चार शिव्या पण खायल्या पण मी तयार आहे. माझ्यावर टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

थेट नाव घेणं टाळलं, पण संशय भाजपवरच :
पुण्यातल्या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी थेट महाराष्ट्रातूनच रसद पुरवली गेली पण ती नेमकी कोणत्या नेत्यानं पुरवली त्यांची नावं त्यांनी जाहीर नाही केली. खरं तर राज ठाकरे स्पष्ट आणि थेट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण याबाबतीत मात्र त्यांनी चित्रं स्पष्ट करण्याऐवजी फक्त इशारा करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं.

पुढे राज ठाकरे म्हणाले, मला मुंबईतून माहीत मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. एक वेळ चाललं की हा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण अडकलं नाही पाहिजेत. या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला.

फडणवीसांपासून केंद्रीय मंत्र्यांच्या राज ठाकरेंच्या घरी भेटी :
विषय थेट उत्तर प्रदेशाशी संबंधित असल्याने भाजपचे अनेक बडे नेते हे राज ठाकरे यांच्यापासून अंतर राखून असल्याचे. मात्र राज ठाकरेंचा अयोध्या दौरा निश्चित होण्यापूर्वी अचानक भाजपचे बडे नेते थेट राज ठाकरेंच्या घरी जाऊ लागले. विशेष म्हणजे ते राज ठाकरेंचा ‘राजकीय जयजयकार’ देखील करत होते. त्यानंतर अयोध्या दौरा निश्चित झाला आणि तारीखही ठरली. मात्र मनसेच्या काही वर्षांपूर्वीच्या उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनावेळी टीका करताना किंवा आक्रमक भूमिका घेताना ना दिसणारे सध्याचे अयोध्येतील खासदार ब्रिज भूषण सिंग समोर आले आणि पुढील प्रकार मागील काही दिवस चर्चेत आहे ते सर्वश्रुत आहे.

मात्र या मध्ये भाजपचे महाराष्ट्रातील सर्व नेते अचानक शांत होतं ‘मौनी बाबाच्या’ भूमिकेत गेल्याचं दिसलं. कोणीही पुढाकार घेतला नाही. विशेष म्हणजे भाजपचे खासदार ब्रिज भूषण सिंग हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचं देखील ऐकत नसल्याची राजकीय पुडी आधीच सोडण्यात आली होती. म्हणजे मनसेतून कोणी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना याबाबत पुढाकार घेण्यास विचारलं तर हे उत्तर तयार होतं. त्याचाच संदर्भ राज ठाकरेंनी आजच्या सभेत दिला. ते म्हणजे यूपीतील एक खासदार तिथल्या मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाही म्हणजे काय?.. तेच होतं महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सोडलेलं राजकीय पिल्लू.

भाजपाला कोणत्याही स्थितीत मुंबई महापालिका हवी आहे :
मुंबई महानगरपालिका हे शिवसेनचं राजकीय शक्तिस्थळ आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तेच भाजपला कोणत्याही स्थितीत हवं आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रचंड राजकीय भूक वाढलेल्या भाजप नेत्यांना दिल्लीतील वजन खूप भक्कम करायचं आहे. मुंबईत शिवसेनेकडे मराठी, उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र आता मुस्लिम मतदारही (महाविकास आघाडीमुळे) जोडले जाणार आहेत. त्यात मुंबईत शिवसेनेची स्थानिक पातळीवर अनुभवी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आणि महिला सेनेची भक्कम फळी आहे. त्यामध्ये भाजप मुंबईत खूपच कमी आहे. त्यात भाजप हा मुंबईत मराठी मतदारांचा आवडता पक्ष नाही आणि मुस्लिम मतदार आपल्याला मतं देणार नाही. तसेच गुजराती मतांवर मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजपच्या नेत्यांना माहिती आहे.

त्यामुळे राज ठाकरे अयोध्येत गेले असते आणि तिकडे यूपीत भाजपच्या नेत्यामार्फत राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात काही अघटिक घटना घडवली असती आणि त्यानंतर भाजप नेत्यांने राज ठाकरे आणि मनसेला अद्दल घडवली अशी राजकीय बोंबाबोंब करून मुंबईत उत्तर भारतीयांकडून मतं मिळवली असती असा देखील यामागून राजकीय अंदाज व्यक्त होतं आहे. पण राज ठाकरे या राजकीय सापळ्यात अडकण्यापूर्वीच सावध झाल्याने राज्यातील भाजप नेत्यांची अडचण झाली आहे हे नक्की. भाजपने आपल्या राजकीय सहकारी पक्षांना कसं संपवलं आणि संपवण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे. मग तोच भाजप पक्ष मनसेला जवळ का करेल हा देखील विचार करून मनसेने स्वतःचं स्वतंत्र राजकारण खेळणं महत्वाचं ठरेल असं राजकीय जाणकार म्हणतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Raj Thackeray rally in Pune check details here 22 May 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या