22 November 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Drone Company Stocks | या 5 ड्रोन कंपन्यांचे शेअर्स खरेदीचा आताच विचार करा | दीर्घकाळात करोडपती व्हाल

Drone Company Stocks

Drone Company Stocks | ड्रोनची उपयुक्तता वाढवण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून सरकारने आपले ड्रोन धोरण उदार केले आहे. त्याचे वैभवशाली भविष्य पाहता ड्रोन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्येही अनेक उपक्रम होत आहेत. त्याचबरोबर शेअर बाजारात काही कंपन्याही आहेत, ज्यांच्याबाबत तज्ज्ञांना विश्वास वाटत आहे.

कोणत्या आहेत कंपन्या :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी ५ ड्रोन बनवणाऱ्या शेअरची यादी केली आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी सुचवलेले 5 स्टॉक्स आहेत – झेन टेक्नॉलॉजी, पारस डिफेन्स, बीईएल, डीसीएम श्रीराम आणि रतन इंडिया एंटरप्रायजेस.

अदानी ग्रुपची इंट्री :
अदानी एंटरप्रायजेस या व्यवसायात उतरणार असल्याने एखाद्याच्या पोर्टफोलिओमध्ये ड्रोन स्टॉक असण्याचे महत्त्व समजू शकते, असे प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले. वास्तविक, अदानी एंटरप्रायजेसने जनरल एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेडमधील ५० टक्के हिस्सा विकत घेण्याचा करार केला आहे.

अदानी ग्रुपकडून ही ड्रोन कंपनी खरेदी :
अदानी इंटरप्रायजेस लिमिटेड (एईएल) ची उपकंपनी अदानी डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 27 मे 2022 रोजी कृषी ड्रोन स्टार्टअप जनरल एरोनॉटिक्समध्ये 50% हिस्सा विकत घेतला आहे. कंपनीने बाइंडिंग अॅग्रीमेंटची माहिती दिली आहे. ३१ जुलै २०२२ पर्यंत अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होईल, असे अदानी एंटरप्रायजेसने म्हटले आहे. मात्र, कंपनीने या कराराची आर्थिक माहिती जाहीर केली नाही. शुक्रवारी अदानी एंटरप्रायजेसचे शेअर्स 2 टक्क्यांनी वधारून 2,085 रुपयांवर बंद झाले.

त्याचप्रमाणे जीसीएल सिक्युरिटीजचे तज्ज्ञ म्हणाले, ‘नव्या ड्रोन धोरणानंतर भारतीय ड्रोन बाजारात मोठ्या प्रमाणात विलीनीकरण आणि अधिग्रहण होत आहे. रतन इंडिया एंटरप्रायजेसने थ्रॉटल एरोस्पेस सिस्टिम्स या भारतातील आघाडीच्या ड्रोन उत्पादक कंपनीतील ६० टक्के हिस्सा विकत घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील ड्रोन बाजारपेठ झेप घेण्याच्या तयारीत असून भारतीय बाजारात सूचिबद्ध असलेल्या प्रमुख ड्रोन कंपन्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी :
अलीकडेच ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोनला कृषी क्षेत्रातील ‘गेम-चेंजर’ म्हणून संबोधले. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ड्रोनची गरज असल्याकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले की, कोव्हिडच्या काळात ड्रोनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात लस पोहोचवण्यास मदत झाली. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेतून गुंतवणूकदारांना आमंत्रित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार करण्यासाठी पीएलआय योजना लवकरच सुरू केली जाईल.

ड्रोनचा वापर :
गेल्या काही वर्षांत ड्रोनचा वापर वाढला आहे. आता केवळ संरक्षणच नव्हे तर कृषी, विमान वाहतूक, आरोग्य सेवा, पर्यटनासह इतर क्षेत्रातही ड्रोनचा वापर केला जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Drone Company Stocks for long term investment check details 28 May 2022.

हॅशटॅग्स

#Drone Company Stocks(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x