21 November 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सरकारी नोकऱ्यांच आमिष व 'आरक्षणाच्या' मोहजालात तरुण भीषण बेरोजगारीकडे जातो आहे? सविस्तर

नवी दिल्ली : सध्या आर्थिक स्थितीवर आधारित आरक्षणामुळे निर्णयामुळे संपूर्ण वर्गाला प्रचंड फायदा की भाजपच्या मतांच्या टक्केवारीला याचा विचार तरुणांनी करणे गरजेचे आहे. कारण दुसरी बाजू अशी आहे, कि ज्या आरक्षणाची भाजप बोंबाबोंब करत आहेत, त्यामुळे कोणाला किती सरकारी नोकऱ्या मिळणार याची त्यांना सुद्धा माहिती नाही. देशात ९५ टक्के नोकऱ्या या खासगीं क्षेत्रात आहेत आणि सरकारने तर जागोजागी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरु केल्या आहेत, म्हणजे शेवटी ते सुद्धा खासगी नोकरी प्रमाणेच आहे.

तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘एआय’ मुळे उरल्या सुरल्या सरकारी नोकऱ्यासुद्धा संपुष्टात येतील. अगदी सनदी अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा सुद्धा खासगी क्षेत्रातील उच्च पदावरील लोकांना खुल्या करण्यात आल्या आहेत. ज्या गोष्टींचा तरुण पिढीला भविष्यात काही फायदाच होणार नाही, मग या तरुणांना या आरक्षणाच्या मोहजालात मोदी सरकार का ढकलते आहे? केवळ लोकसभा निवडणुकीसाठी? हे भविष्यासाठी फार भीषण आहे.

तरुणांच्या मनात सरकारी नोकरीचे भूत उतरवून जर त्यांच्या वयाच्या मर्यादा वाढत राहिल्या आणि त्यावेळी सुद्धा जर ते बेरोजगार असतील तर त्यांना खासगी नोकरी मिळणे सुद्धा कठीण होऊन बसेल, हे वास्तव आहे. त्यामुळे मोदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही भावनिक साद म्हणजे तरुणांना मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत असंच म्हणावं लागेल. आधीच जागतिक स्तरावरील नोकऱ्यांची कमतरता असताना आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे म्हणजे तंत्रज्ञानाच्या ऑटोमेशनमुळे रोजगारांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कारण याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे जगभरातील ७ कोटींपेक्षा अधिक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असा अहवाल एका जग विख्यात संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे मनुष्य करू शकेल अशी अनेक कामं मशिन्सच्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि बेरोजगार होण्याची वेळ येईल. अगदी अकाउंटिंग, ड्रायव्हर, डाटाएंट्री पासून ते थेट रिसेप्शन आणि शॉपिंगसारखी असंख्य कामं ही भविष्यात आता मशिन्सच्या माध्यमातूनच होणार आहेत. या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे चुकांची शक्यताही जवळपास संपुष्टात येते तसेच उत्पादकताही वाढते. त्यामुळं कोणतीही छोटी मोठी मनुष्य आधारित कामं तसेच उच्च दर्जाची काम सुद्धा याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे होणार आहेत.

या अहवालात सूचित करण्यात आल्याप्रमाणे पुढील ७ वर्षांमध्ये मनुष्याची अर्ध्यापेक्षा अधिक कामं म्हणजे जवळपास अंदाजे ५२ टक्के कामं ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतील. सध्या मनुष्याच्या एकूण कामांपैकी केवळ २९ टक्के कामं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतात आणि प्रमाण भविष्यात थेट ५२ टक्क्यांवर जाणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्समुळे अगदी डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, टेक्नेशियन्स, व्हेंडर्स, ऑपरेटर्स, विश्लेषण करणारे तज्ज्ञ, व्हिडीओ एडीटर्स, कॅमेरामन्स अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी जाण्याचा मोठा धोका भविष्यात आहे. त्यामुळे उद्योगांची वेतनावर होणारी प्रचंड अर्थशक्ती बचत होणार आहे. त्यामुळे केवळ जगभरातीलच नव्हे तर भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर प्रचंड गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून कामगार, पगार आणि कर्मचाऱ्यांना द्याव्या लागण्याच्या सुविधा या पासून स्वतःची सुटका करण्यासाठी घेण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मालकांनी गुणतवणूक खर्ची घालण्याचे निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे तरुणांनी वास्तव झुगारून सरकारच्या आरक्षणाच्या भरोशे भविष्यकाळ रेखाटण्यास सुरुवात केल्यास ते केवळ निवडणुकीच्या राजकारणाचे बळी ठरतील अशीच शक्यता अधिक आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x