23 November 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Infinix InBook X1 Slim | पॉवरफुल बॅटरीसह इनफिनिक्सचा सर्वात स्लीम लॅपटॉप भारतात दाखल होणार

Infinix InBook X1 Slim

Infinix InBook X1 Slim | इनफिनिक्स आपला इनबुक एक्स १ स्लिम लॅपटॉप भारतात दाखल करणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने आपला इनफिनिक्स इनबुक एक्स 1-सीरीज लॅपटॉप भारतात दाखल केला होता. आता, कंपनी इनबुक एक्स 1 स्लिम भारतात दाखल करून आपल्या लॅपटॉप पोर्टफोलिओ विस्तारित करण्याचा विचार करत आहे. इनबुक एक्स १ स्लिम पुढील आठवड्यात भारतात दाखल होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तर मग चला अधिक माहिती जाणून घेऊया.

कसा आहे इनबुक एक्स १ स्लिम लॅपटॉप :
१. इनफिनिक्स आपला इनबुक एक्स १ स्लिम इंडिया लॅपटॉप 15 जूनपर्यंत भारतात दाखल होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
२. कंपनीच्या मत आहे की हा लॅपटॉप कमी किंमतीतही अनेक नवीन आणि आकर्षक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा आहे.
३. इनफिनिक्स इनबुक एक्स १ स्लिम लॅपटॉपची जाडी १४.८८ असून त्याचे वजन १.२४ किलो आहे. इन्फिनिक्सच्या मते, हा याच्या प्राइस सेगमेंटमधील सर्वात हलका आणि स्लिम लॅपटॉप आहे.
४. इनफिनिक्स इनबुक एक्स 1 स्लिम हा संपूर्ण मेटलने बनलेला आहे आणि हा आपल्याला लाल, हिरवा, निळा आणि ग्रे अशा चार नव्या रंगामध्ये मिळू शकेल.
५. डिव्हाइसमध्ये मोठी बॅटरी आणि टाइप-सी पोर्ट आहे.

इनबुक एक्स १ स्लिम लॅपटॉपचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
* इनफिनिक्स इनबुक एक्स १ स्लिममध्ये इनफिनिक्स इनबुक एक्स २ सारखीच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
* इनफिनिक्स इनबुक एक्स १ स्लिम हा देशातील इनबुक एक्स २ चा रिब्रँडेड व्हेरियंट असण्याची शक्यता आहे. तसेच युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन कंपनी डिव्हाइसमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेणार आहे.
* इनबुक एक्स १-सीरिज लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत ३५,९९९ रुपये आणि हाय-एंड मॉडेलची किंमत ५५,९९९ रुपये होती.
* इनफिनिक्स इनबुक एक्स २ विंडोज ११ होमवर काम करते. यात १४ इंचाचा फुल-एचडी (१,९२०x१,०८० पिक्सल) आयपीएस डिस्प्ले, ३०० निट्स ब्राइटनेस आणि १६: ९ आस्पेक्ट रेशियो आहे.
* या लॅपटॉपमध्ये कोअर आय ३-१००५जी१ प्रोसेसर, इंटेल कोअर आय ५-१०३५ जी१ आणि इंटेल कोअर आय ७-१०६५ जी ७ असून १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एम.२ एसएसडी पीसीआय ३.० स्टोरेज आहे.
* कनेक्टिव्हिटीसाठी यात इनबुक एक्स २ स्पोर्ट्स ड्युअल-बँड वाय-फाय ८०२.११ एबी / बी / जी / एन / एसी, ब्लूटूथ व्ही ५.१, दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी ३.० पोर्ट, एक एचडीएमआय १.४ पोर्ट आणि ३.५ मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे.
* यात डीटीएस साउंड टेक्नॉलॉजीसह स्टिरिओ स्पीकर्स आहेत. शिवाय, यात दिवसभर चालणारी 50Wh ची बॅटरी आहे.  या लॅपटॉपमध्ये ३२३.३x२११.१x१४.८ मिमीचे डायमेन्शन्स असून त्याचे वजन १.२४ किलो आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Infinix InBook X1 Slim laptop with attractive design check details 9 June 2022.

हॅशटॅग्स

#Infinix Inbook X1 Slim(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x