23 November 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Eknath Shinde | अविश्वास ठरवासाठी एकनाथ शिंदे ठरवून दिलेल्या 'राजकीय स्क्रिप्ट'प्रमाणेच बोलतील अशी राजकीय चर्चा

Eknath Shinde

Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी संपर्कात :
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.

शिवसेना पक्षाच्या आमदारांची बैठक :
मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.

विधान परिषद – भाजपचं संख्याबळ हे 134 :
विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचं संख्याबळ हे 134 झालं आहे. त्यामुळे भाजप आता अविश्वास ठराव मांडले अशी चर्चा रंगली आहे. पण, त्यासाठी भाजपला आणखी संख्या जुळवावी लागणार आहे. पण, आता एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे तीन मंत्री शिंदे यांच्यासह गायब :
महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तीन मंत्री शिंदे यांच्यासह गायब आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि पैठणचे मंत्री संदीपान भुमरे हेही शिंदे यांच्यासह नॉट रिचेबल आहेत. यात शिवसेनेचे वजनदार आमदार रात्रीपासूनच नॉटरिचेबल आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in communication with BJP leaders check details 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x