22 November 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Eknath Shinde | भाजप पक्ष कार्यालये शिवसैनिकांकडून लक्ष्य ठरू शकतात | भाजप कार्यालयांना संरक्षण

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच हे वृत्त आलं आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.

अमित शहा यामध्ये सक्रीय :
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात विचित्र परिस्थिती राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या बंडाळीला भारतीय जनता पक्षाकडून गेल्या अनेक दिवसांपासून पुरेपूर रसद पुरवण्यात आली आहे. दिल्लीतून स्वत: गृहमंत्री अमित शहा यामध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

जे काही करता येईल ते भाजप करतंय :
गेल्या तीन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. आमदार संजय कुटे हे स्वतः एकनाथ शिंदे यांना सुरतमध्ये हॉटेलमध्ये भेटले होते. शिवसेना आमदारांना सुरतवरून गुहावटीमध्ये येण्यासाठी मोहित कंबोज यांची पळापळ दिसून आली होती. हे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जे काही करता येईल ते सर्व पणाला लावून करण्यास सुरुवात केली आहे.

फडणीस दिल्लीमध्ये :
दुसरीकडे देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी करून मुंबईत परतले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय जनता पक्ष कार्यालये शिवसैनिकांकडून लक्ष्य ठरू शकतात ही शक्यता गृहित धरुन राज्यातील सर्व भाजप कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. शिवसैनिकांचा उद्रेक होऊ शकतो ही शक्यता त्याच्यामागे वर्तवली जात आहे. त्यामुळेच सर्व कार्यालयांना संरक्षण दिल्याचे दिसून येत आहे.

शिवसैनिक रस्त्यावर :
कालपासून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, इतकेच नव्हे तर शिवसेना भवनासमोरही बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही काळामध्ये शिवसैनिकांच्या रागाचा सामना भाजप नेत्यांना किंवा भाजप कार्यकर्त्यांना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde form a group against Shivsena check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x