22 November 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Eknath Shinde | शिवसेनेकडून व्हीप जारी | बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कारवाईला सुरुवात

Eknath Shinde

Eknath Shinde | पक्षाचे निष्ठावंत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भगदाडच पाडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता शिवसेनेनं व्हीप जारी केला असून, आज सायंकाळी ५ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली :
पक्षाविरुद्ध बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर शिवसेनेनं आता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शिवसेनेनं सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.

व्हीप जारी केला :
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधीमंडळाचे मुख्य प्रनोत सुनिल प्रभू यांनी व्हीप जारी केला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, “पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी २२ जून रोजी वर्षा बंगला, येथे ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहणं आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.

अपात्रतेसंदर्भात कारवाई :
या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेनेचं सदस्यत्व सोडायचा इरादा आहे, असं मानलं जाईल. परिणामी तुमच्यावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.

Eknath-Shinde

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde against MahaVikas Aghadi political stand check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x