शिंदे गटाच्या अनेक आमदारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पत्ता कट होणार | त्या भाजप नेत्यांच्या संधीचा प्लॅन तयार
Eknath Shinde | शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा अधिक आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा गेल्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन भेटावं असं सांगत मातोश्री सोडली. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर चित्र आणखीनच बदललं आहे.
फुटलेले आमदार आणि त्या मतदारसंघातील भाजप पदाधिकारी :
शिवसेनेचे आमदार जे सध्या एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत, त्याच्यावरून भाजपचे त्या-त्या मतदारसंघातील वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचं वृत्त आहे. अनेकांनी फोनाफोनी करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबद्दल आत्ता पासूनच विचारणा सुरु केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. शिंदे गटातील अनेक विद्यमान आमदारांना शिवसेनेसोबत युती झाल्याने जागा वाटपात संधी मिळाली नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली आणि महाविकास सरकार स्थापन झालं होतं.
‘शतप्रतिशत नाऱ्यामुळे’ ते भाजप नेते कामाला लागले :
मात्र त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी जोरदार तयारी आपल्या मतदारसंघात सुरु केली होती. त्याला कारण होतं स्वतः देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘शतप्रतिशत भाजपचा’ दिलेला नारा आणि त्यानुसार भाजप राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवेल हे निश्चित झालं होतं. अनेकांनी तिकिटासाठी आधीपासूनच फिल्डिंग लावली आहे आणि स्वतःच्या मतदारसंघात काम सुरु केले होते. मात्र सध्याच्या घडामोडीनंतर आता शिंदे गटासोबत जागावाटप होणार का याची विचारणा या मतदारसंघातील नेत्यांनी स्वतःच्या राजकीय गॉडफादरमार्फत केली आहे. त्यात धक्कादायक माहिती एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
भाजपचा प्लॅन २०२४ :
या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या शिवसेनेत जे एकनाथ शिंदे यांच्यामार्फत बंड पुकारण्यात आलं आहे ते २०२४ मधील लोकसभा, विधानसभा आणि काही दिवसांवर आलेल्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घडविण्यात आलं आहे. प्रथम विधानसभेत भाजपचं सरकार आणायचं आणि त्यानंतर महत्वाच्या महानगरपालिका त्याजोरावर जिंकायच्या अशी योजना आहे. मात्र राज्यात एकही मोठा पक्ष सोबत नसल्याने सध्याच्या घडामोडी नियोजितपणे घडविण्यात आल्या आहेत. फुटीरवादी आमदारांवर तसा भाजपचाही विश्वास नाही आणि त्यामुळे केवळ सध्या विधानसभा स्वतःकडे घेण्यासाठी आणि आगामी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेंना बळ दिलं आहे.
त्या आमदारांना तिकीट मिळेलच असं नाही :
मात्र २०२४ मध्ये या आमदारांना संधी मिळेलच असं नाही तसेच शिवसेनेला जेवढा युतीत जागा दिल्या जायच्या तेवढ्या जागा म्हणजे दिवा स्वॅप ठरणार आहे. या बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांपैकी अनेकांचा पत्ता विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात कट होणार आहे आणि शिंदेंना त्यापासून अंधारात ठेवण्यात आलं आहे. शिंदे गटातील ज्यांना टाकीत मिळेल त्यांना पाडण्यासाठीच स्थानिक भाजप नेते काम करतील आणि किती जणांचा पत्ता कट होणार हे त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही, पण हा आकडा तब्बल ३०-३५ विद्यमान आमदारांचा असू शकतो अशी धक्कादायक माहिती दिली आहे. शिंदेंचं राजकारण इतक्या टोकाला भाजपने ठेवून दिलं आहे की त्यांच्याकडे भाजपच्या श्रेष्ठींपुढे घरंगळत जाण्यापलीकडे दुसरा पर्याय नसेल. झालंच तर शिंदेंच्या मुलाला आणि स्वतः एकनाथ शिंदेंना तिकीट देऊन खुश करण्यात येईल.
भाजपमध्ये स्थानिक पातळीवर अनेक धनाढ्य नेते बसले आहेत तर, अनेकांचा थेट दिल्लीत आणि आरएसएस मध्ये संपर्क असल्याने शिंदे गटाच्या त्या आमदारांचं आणि शिंदेंचंही अधिक काही चालेल असं वाटत नाही असं देखील या नेत्याने सांगितलं. अनेकांनी मागील दोन दिवसांपासून वरिष्ठांकडून याबाबत खात्री करून घेतली आहे आणि अनेकपण यावर आधीच वरिष्ठांना भेटण्याच्या तयारीत आहेत. तसेच एकनाथ शिंदे पूर्णपणे भाजपच्या नियंत्रणात आले आहेत असं या नेत्याने खात्रीने सांगितलं. जर त्यांनी उद्धव ठाकरेंची तमा बाळगली नाही तर ते आयत्यावेळी या आमदारांचा विचार करतील असं त्यांच्या राजकीय हालचालीवरून वाटत नाही.
फडणवीसांनी शिंदेंना शब्द दिल्यास काय असं विचारलं तेव्हा :
स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जरी या आमदारांना भेटून शब्द दिल्यास ती ‘राजकीय वचन’ देण्याची पद्धतच असेल. फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे हयातीत असताना विधासनभा निवडणुकीत ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशी टॅगलाईन त्यांच्या समर्थकांमार्फत दिली होती. तसेच त्यांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंची गय केली नाही तिथे ते एकनाथ शिदेंची कुठे गय करतील असं वक्तव्य या नेत्याने केले. अगदी एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपात विलीन जरी झाला तरी फडणवीस पक्षात दुसऱ्या नेत्याला मोठं होऊ देत नाहीत तर त्यांच्या आमदारांना कोण विचारणार असं देखील या नेत्याने सांगितलं. त्यामुळे सध्याची राजकीय घडामोड ही शिंदे गटात गेलेल्या शिवसनेच्या अनेक आमदारांची राजकीय आत्महत्या ठरेल अशीच अंतर्गत माहिती समोर आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Eknath Shinde against Shivsena and BJP Game plan for 2024 check details 23 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार