22 November 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Eknath Shinde | एकाबाजूला सेनेत बंड | दुसऱ्या बाजूला ईडीची दबावाची कव्हर फायरिंग? | बघा काय घडतंय

Eknath Shinde

Eknath Shinde | गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध लढण्याचे कुभांड याच हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रचले जात आहे. सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या पंचतारांकित हॉटेलमध्ये 70 खोल्या सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बंडखोर आमदार सोमवारी भाजपशासित गुजरातमधील हॉटेलमध्ये होते. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम आसामामधिल गुवाहटीला हालवला. स्थानिक राजकारण्यांच्या मते इथे फुड आणि इतर सेवांचा दररोजचा खर्च अंदाजे 8 लाख रुपये आहे म्हणजे सात दिवसांचा संपूर्ण खर्च 1.14 कोटी रुपये आहे.

राज्यात एकीकडे राजकीय भूकंप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलत खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ED कडून जप्तीची कारवाई करण्यात आलीय. सदर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाई अंतर्गत कारखान्याची जमीन आणि तेथील यंत्रसामुग्री ED ने जप्त केलीय.

दरम्यान, या कारवाईमुळे खोतकर-दानवे वाद पुन्हा चिघळणार असून ED चा धाक दाखवून थेट भाजप अथवा बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडे खेचण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली असून खोतकर यांनी मात्र आपण घाबरणार नाही, असं म्हणत यान चर्चेला तूर्तास विराम लावण्याचा प्रयत्न केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel and ED in action against Shivsena leaders check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x